मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळच्या चहाचा परफेक्ट सोबती आहे चीज चिली वडा पाव

संध्याकाळच्या चहाचा परफेक्ट सोबती आहे चीज चिली वडा पाव

Hiral Shriram Gawande HT Marathi
Aug 17, 2022 05:41 PM IST

पावसाळ्यात गरमा गरम चहासोबत काहीतरी चटपटीत स्नॅक्स खायचा मूड झाला असेल तर ट्राय करा चीज चिली वडा पाव. अगदी सोपी आहे ही रेसिपी.

वडा पाव
वडा पाव

चीज चिली वडा पाव हा देसी स्नॅक आहे. या डिशमध्ये तुम्हाला दोन फ्लेवर्स चाखायला मिळतात. सामान्यतः वडा पावाच्या आत बटाटा वडा असतो पण चीज चिली वडा पावमध्ये वडा हिरवी मिरची आणि भरपूर मसाले घालून बनवले जाते. वडा पावपेक्षा वेगळा दिसतो, पण चव उत्कृष्ट आहे. तुम्ही ते लसूण चटणीसोबत किंवा तुमच्या आवडत्या डिपसोबत सर्व्ह करू शकता. वडा पाव हा प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. जो तुम्हाला सुद्धा संध्याकाळी चहासोबत खायला नक्कीच आवडेल.

चीज चिली वडापाव बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- २ मध्यम बटाटे

- २ पाव

- १/२ कप बेसन

- १/४ कप किसलेले लो फॅट मोझझेरेला चीज

- १ मूठभर चिरलेला कांदा

- १/४ चिरलेली हिरवी मिरची

- कढीपत्ता

- १ कप कोथिंबीर

- १ टीस्पून चिरलेला लसूण

- १ टीस्पून लसूण पावडर

- १ टीस्पून लिंबाचा रस

- १ चिमूट खाण्याचा सोडा

- १ चमचा चिंचेची चटणी

- २ चमचे तेल

- १/२ टीस्पून मोहरी

- ३/४ टीस्पून जिरे पावडर

- १ टीस्पून लाल मिरची पावडर

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून धने पावडर

- ३/४ टीस्पून साखर

- मीठ आवश्यकतेनुसार

चीज चिली वडा पाव बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम बटाटे उकळवून मॅश करा. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मोहरी, लसूण, मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला. नीट तळून घ्या. नंतर मॅश केलेले बटाटे आणि मोहरी पावडर, लाल तिखट, धनेपूड, लिंबाचा रस, बेसन आणि साखर घाला. गॅस बंद करा आणि बटाट्याचे मिश्रण बाजूला ठेवा. आता ग्राइंडरमध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला आणि नंतर तयार केलेले मिश्रण घाला. हे मिश्रण चांगले एकजीव करून बाजूला ठेवा. एका भांड्यात बेसन, हळद, बेकिंग सोडा आणि मीठ घाला आणि मिक्स करा. नंतर पाणी घाला. आता ते पुन्हा मिक्स करून भज्याचे पीठ बनवा. शेवटी गरम तेलाचे काही थेंब घाला. मिक्स करा.

कढईत तेल गरम करून बटाट्याचे मिश्रण घ्या, बेसनाच्या पिठात बुडवून घ्या. यानंतर वडे तळून प्लेटमध्ये काढा. आता वडा पाव मधून कापून घ्या. त्यात चिंचेची चटणी आणि लसूण पावडर घाला. नंतर हिरवी मिरची वडा ठेवून त्यावर किसलेले चीज शिंपडा. तुमचा चीज चिली वडा पाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या डिप्ससह सर्व्ह करू शकता. तसेच चहा सोबत सुद्धा गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel