Summer Skin Care Tips: उन्हाळा आला आहे. या गर्मीमुळे सर्वांचेच जगणे कठीण झाले आहे. अगदी थोड्या काळासाठी उन्हात राहिलो तरी त्रास होतो. योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यापैकी ओठ फाटण्याची समस्या. तीव्र सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ फुटू शकतात. यामुळे ओठ कोरडे होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. यासाठी केवळ लिप बाम काम करत नाही. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लवकरच फरक दिसेल.
ओठ मऊ करण्यासाठी कॉफी पावडर देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात कॉफी पावडर घ्यायची आहे आणि त्यात थोडे खोबरेल तेल टाकून पेस्ट बनवा. यानंतर ते ओठांवर लावा.
कोरफड हे त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट काम करते. हे तुमचे फाटलेले ओठ देखील मऊ करू शकतात. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळा आणि हे मिश्रण नियमितपणे ओठांवर लावा.
व्हिटॅमिन ई गोळ्या एक उत्तम उपाय म्हणून काम करू शकतात. केवळ ओठांसाठीच नाही तर सर्वसाधारणपणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. या गोळ्या सहज उपलब्ध आहेत.
घरी लिप बाम बनवण्यासाठी, २ चमचे खोबरेल तेल, अर्धा चमचे शिया बटर, १ चमचे किसलेले मेण, १० थेंब व्हिटॅमिन ई तेल आणि १० थेंब इसेंशल तेल घ्या. खोबरेल तेल, शिया बटर आणि मेण वितळू द्या आणि नंतर थंड होऊ द्या त्यात व्हिटॅमिन ई तेल आणि इसेंशल तेल घाला. तुमचा बाम तयार आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या