मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chutney Recipe: झटपट बनवा हरभरा डाळीची चटपटीत चटणी, बोरिंग जेवणाची वाढेल चव

Chutney Recipe: झटपट बनवा हरभरा डाळीची चटपटीत चटणी, बोरिंग जेवणाची वाढेल चव

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2024 01:42 PM IST

Chutney Recipe: चटणी आणि लोणचे हे जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. तुम्हाला चटपटीत चटणी खायची इच्छा असेल तर हरभऱ्याच्या डाळीची ही चटणी झटपट बनवा.

हरभरा डाळीची चटणी
हरभरा डाळीची चटणी (unsplash)

Chana Dal Chutney Recipe: रोजच्या जेवणाची चव वाढवायची असेल तर त्यासोबत चटपटीत चटणी तयार करा. चटणीसारख्या साइड डिशने जेवणाची चव तर वाढतेच पण ते खाल्ल्याने आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. जेवण दुपारचे असो वा रात्रीचे रोज नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हाला तुमचे कंटाळवाणे पदार्थ चटपटीत बनवायचे असतील तर हरभऱ्याची ही साधी चटणी तयार करा. काही मिनिटांत तयार होण्यासोबतच ही चवदार आणि आरोग्यदायीही आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घ्या कशी बनवायची हरभरा डाळीची ही चटणी.

हरभरा डाळीची चटणी बनवण्यासाठी साहित्य

- १ वाटी हरभरा डाळ

- २-३ कोरड्या लाल मिरच्या

- १ चमचा तेल

- अर्धा चमचा मोहरी

- अर्धा चमचा जिरे

- कढीपत्ता

- १ चमचा उडीद डाळ

- आले

- हळद

- अर्धा कप किसलेले ताजे खोबरे

- १ चमचा चिंचेचा कोळ

हरभरा डाळीची चटणी बनवण्याची पद्धत

ही चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल टाका. नंतर त्यात हरभरा डाळ आणि लाल मिरची घालून भाजून घ्या. हरभरा डाळ चांगले भाजून झाल्यावर कढईतील तेलात हिंग, जिरे, आल्याचे तुकडे आणि कढीपत्ता घालून भाजून घ्या. आता या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात टाका. तसेच सुमारे अर्धा किंवा चतुर्थांश कप ताजे किसलेले खोबरे आणि मीठ टाका. नीट मिक्स करा. आता मिक्सरच्या भांड्यात एक चमचा चिंचेचा कोळ टाका. आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले बारीक करून घ्या. आता कढईत अर्धा चमचा तेल टाका. त्यात जिरे आणि मोहरी टाका आणि तडतडून घ्या. तसेच उडीद डाळ आणि कढीपत्ता घालून परतून घ्या. हा तडका तयार केलेल्या हरभरा डाळ चटणीवर टाका. तुमची टेस्टी आणि चटपटीच चटणी तयार आहे.

WhatsApp channel