Soup Recipe: हिवाळ्यात टेस्टी लागते गरमागरम गाजर बीटरूटचा शोरबा, ट्राय करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Soup Recipe: हिवाळ्यात टेस्टी लागते गरमागरम गाजर बीटरूटचा शोरबा, ट्राय करा ही रेसिपी

Soup Recipe: हिवाळ्यात टेस्टी लागते गरमागरम गाजर बीटरूटचा शोरबा, ट्राय करा ही रेसिपी

Jan 22, 2024 09:48 PM IST

Winter Special Recipe: हिवाळ्यात गरमागरम सूप प्यायला सगळ्यांना आवडते. तुम्हाला सुद्धा सूप प्यायचे असेल तर ट्राय करा गाजर आणि बीटरूटच्या शोरबाची ही रेसिपी.

गाजर बीटरूट शोरबा
गाजर बीटरूट शोरबा (freepik)

Carrot Beetroot Shorba Recipe: थंडीच्या दिवसात गरमागरम पदार्थ, सूप प्यायला कोणाला आवडत नाही. सूप फक्त टेस्टी नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. शिवाय थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी सुद्धा ते फायदेशीर आहे. तुम्हाला सूप किंवा शोरबा बनवायचे असेल तर तुम्ही गाजर आणि बीटरूटचा शोरबा बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे. जाणून घ्या गाजर बीटरूट शोरबाची रेसिपी.

गाजर बीटरूटचे शोरबा बनवण्यासाठी साहित्य

- ४ गाजर

- ४ बीटरूट

- १ तुकडा आले

- ४ तमालपत्र

- ५ हिरव्या मिरच्या

- ४ चमचे कोथिंबीर

- २ चमचे तेल

- १/२ चमचा जिरे

- ६ कप पाणी

- चवीनुसार मीठ

गाजर बीटरूट शोरबा बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी आधी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र, जिरे आणि आले घाला. जिरे तडतडल्यावर कढईत चिरलेले गाजर, बीटरूट आणि हिरव्या मिरच्या घाला. गार्निशिंगसाठी थोडी गाजर आणि बीटरूट बाजूला ठेवा. आता हे ५ मिनिटे शिजवा. आता पॅनमध्ये पाणी घाला. पाणी चांगले उकळू लागल्यावर गॅस बंद करा. आता हे गाळून घ्या आणि ग्राइंडरमध्ये प्युरी करा. गाळलेले पाणी फेकून देऊ नका तर आता हे पाणी तयार प्युरीमध्ये घालून उकळून घ्या. मीठ घालून दोन-चार मिनिटे शिजवा. गॅस बंद करून गाजर-बीटरूटने सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner