Cabbage Patties: मुलं कोबी खाण्याचा कंटाळा करतात का? या रेसिपीने बनवा टेस्टी पॅटीस
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cabbage Patties: मुलं कोबी खाण्याचा कंटाळा करतात का? या रेसिपीने बनवा टेस्टी पॅटीस

Cabbage Patties: मुलं कोबी खाण्याचा कंटाळा करतात का? या रेसिपीने बनवा टेस्टी पॅटीस

Feb 19, 2024 05:16 PM IST

Kids Recipe: मुलं भाजी खाण्याचा खूप कंटाळा करतात. तुमची मुले सुद्धा कोबी खाण्यास नकार देत असतील तर त्यांना कोबीचे हे पॅटीस बनवून खायला द्या. ते आवडीने ही भाजी खातील. पाहा रेसिपी.

कोबीचे पॅटीस
कोबीचे पॅटीस (freepik)

Cabbage Patties Recipe: मुले अनेकदा भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. कोणतीही भाजी किंवा सलाद खाण्यासाठी ते नाक तोंड एक करतात. अशा परिस्थितीत मुलांना हेल्दी भाज्या कशा खायला द्यावे हे आईसाठी मोठे आव्हान असते. पण एक स्मार्ट मॉम तीच असते जी आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे सकस आहार देते. जर तुमची मुलेही भाज्या खाणे टाळत असतील तर भाज्यांचे टेस्टी पॅटीज बनवून खायला द्या. त्यामुळे त्यांना डाळींचे पोषण तर मिळेलच पण त्यांना भाजीही सहज खायला मिळेल. तुमची मुले कोबी खात नसतील तर त्यापासून पॅटीस बनवू शकता. कोबीचे पॅटीस कसे बनवायचे ते जाणून घ्या.

कोबी पॅटीस बनवण्यासाठी साहित्य

- ३/४ हरभरा डाळ

- २ चमचे तांदळाचे पीठ

- बारीक चिरलेला कोबी

- १ चमचा आले-लसूण पेस्ट

- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

- २ चमचे पुदिन्याची पाने

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- १ चमचा गरम मसाला

- १ चमचा लाल तिखट

- मीठ चवीनुसार

कोबी पॅटीस बनवण्याची पद्धत

कोबी पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभरा डाळ धुवून पाणी काढून टाकावे. त्यानंतर साधारण दीड तास पाण्यात भिजत ठेवा. आता कोबी बारीक कापून घ्या. साधारण पाच मिनिटे कोमट पाण्यात कोबी भिजवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून गाळून घ्या. बारीक चिरलेली कोबी एका बाऊलमध्ये घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता आणि एक चतुर्थांश वाटी हरभरा डाळ मिक्स करा. उरलेली हरभरा डाळ मिक्सरमध्ये बारीक करा. डाळ बारीक करण्यासाठी पाण्याचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. आता ही डाळीची पेस्ट कोबीच्या मिश्रणात घाला. तसेच गरम मसाला आणि लाल तिखट घाला. चांगले मिक्स करा आणि सुमारे १० मिनिटे बाजूला ठेवा. जेणेकरून कोबीमधून ओलावा निघून जाईल. आता त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा. आता हे मिश्रण हातात घेऊन चेक करा की ते सहजपणे बांधता येतात की नाही. नसेल तर अजून थोडं तांदळाचं पीठ घाला. चवीनुसार मीठ आणि मसाले देखील टाका. आता हाताला थोडे तेल लावून चापट गोल पॅटीस तयार करा. 

एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून या सर्व पॅटीज सोनेरी होईपर्यंत तळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डीप फ्रायही करू शकता. पण तव्यावर कमी तेलात शॅलो फ्राय करणे हे जास्त आरोग्यदायी असते. तुमचे टेस्टी कोबी पॅटीस तयार आहे. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner