मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cabbage Paratha Recipe: विकेंडला नाश्त्यासाठी बनवा कोबीचा पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Cabbage Paratha Recipe: विकेंडला नाश्त्यासाठी बनवा कोबीचा पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 06, 2024 10:13 AM IST

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी कोबीपासून बनवलेला पराठा ही एक उत्तम आरोग्यदायी रेसीपी आहे.

Winter Food Recipe
Winter Food Recipe (freepik)

Healthy Breakfast Recipe: हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या भाज्यांपैकी एक कोबी देखील आहे. कोबीची भाजी घरीच मोठ्या प्रमाणात तयार करून खाल्ली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की कोबीचा पराठाही बनवता येतो. होय, कोबीपासून बनवलेला पराठा हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम रेसिपी आहे. हे जेवढे खायला चविष्ट आहे, तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्याची चव प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही आवडते. त्याची खासियत अशी आहे की, तुम्ही हवं तेव्हा ते तयार करून खाऊ शकता. जर तुम्हाला रोज सामान्य पराठा खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही कोबीचा पराठा करून पाहू शकता. ते बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्ही कच्चा किंवा वाफवलेला कोबी वापरू शकता. चला जाणून घेऊया कोबी पराठा बनवण्याची सोपी पद्धत.

लागणारे साहित्य

चिरलेली कोबी - १ कप

गव्हाचे पीठ - १ कप

देशी तूप - १/४ कप

दही - १ कप

हिरवी मिरची - १

जिरे- १/२ टीस्पून

चिरलेली कोथिंबीर - २ चमचे

लाल मिर्च पावडर - १/४ टीस्पून

मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

प्रथम कोबी चांगला धुवा आणि बारीक चिरून घ्या. आता चिरलेल्या कोबीमध्ये थोडे मीठ घाला आणि एका भांड्यात १५ मिनिटे तसेच ठेवा. यामुळे कोबीमधील अतिरिक्त पाणी निघून जाईल. निर्धारित वेळेनंतर, कोबीमध्ये पीठ घालून मिक्स करावे. चांगले एकजीव झाल्यावर त्यात जिरे, लाल तिखट, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि दही घालून मिक्स करा. यापुढे नंतर आवश्यकतेनुसार पाणी वापरून पीठ मळून घ्या.

यानंतर, एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम होईपर्यंत पिठाचे गोळे बनवा. आता हे गोळे घेऊन हव्या त्या आकाराच्या पराठ्यात लाटून घ्या. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकून सगळीकडे पसरून घ्या. पराठा भाजण्यासठी तव्यावर घाला. पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये पराठा काढा. आता तुम्ही गरमागरम कोबीचा पराठा, चव आणि पौष्टिकतेने परिपूर्ण, लोणचे किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

WhatsApp channel