Butter Garlic Potato Recipe: लहान मुले असो वा मोठे बटाट्याचे पदार्थ खायला सर्वांना आवडते. अनेक वेळा काहीतरी चटपटीत खायचे असते पण बनवण्यासाठी आवश्यक साहित्य किंवा पुरेसा वेळ नसतो. तुमच्यासोबतही असे होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अगदी काही मिनिटांत बटर गार्लिक पोटॅटो बनवू शकता. ही रेसिपी खायला टेस्टी आहे शिवाय झटपट तयार होते. तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या बटर गार्लिक पोटॅटोची रेसिपी
- १५-२० लहान आकाराचे बटाटे
- ६-७ पाकळ्या लसूण बारीक चिरून
- ३ चमचे बटर
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- दीड टीस्पून जिरे पावडर
- १ टीस्पून आमचूर पावडर
- १ चमचा ओरेगॅनो
- १ चमचा चिली फ्लेक्स
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
सर्वप्रथम अगदी लहान आकाराचे बटाटे घेऊन ते उकळून घ्या. हे बटाटे उकडल्यावर ते सोलून बाजूला ठेवा. ते थोडे थंड झाल्यावर हे उकडलेल्या बटाट्यांमध्ये काटा चमच्याने छोटे छिद्र करा. जेणेकरुन त्याला चारही बाजूंनी छिद्रे असतील आणि मसाले आतमध्ये प्रवेश करू शकतील. आता मसाला तयार करा. प्रथम मसाल्यात मीठ घाला. तसेच काळी मिरी पावडर घालावी. आमचूर पावडर, जिरे, तिखट घालून मिक्स करा. हा मसाला काट्याने टोचलेल्या बटाट्यांमध्ये घाला. सुमारे १० मिनिटे तसेच राहू द्या. आता पॅनमध्ये बटर घाला. लोणी वितळताच त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. लसूण मोठ्या आचेवर सोनेरी होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात मसाल्यांने कोट केलेले बटाटे घाला. मंद आचेवर बराच वेळ भाजून घ्या.
भाजतांना हे थोड्या थोड्या वेळाने हलवा जेणेकरून बटाट्याला मसाल्यांची चव येते आणि बटाटे किंचित सोनेरी होतात. नंतर त्यात ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीरने गार्निश करा. तुमचे टेस्टी बटर गार्लिक पोटॅटो तयार आहे.
संबंधित बातम्या