How to Make Broccoli Pasta: हिवाळ्यात भरपूर भाज्या बाजारात येतात. हिरव्या भाज्या तर मुबलक प्रमाणात असतात. ब्रोकोली खाण्याचा ट्रेंड कही वर्षांपासून आला आहे. हिवाळ्यात बाजारपेठा ब्रोकोलीने गजबजून जातात. फिटनेस फ्रिक लोक ब्रोकोलीचे सूप आणि सॅलड लोक मोठ्या उत्साहाने खातात. पण अनेकांना याची चव आवडत नाही. तुम्हालाही ब्रोकोली खायची असेल पण त्याची चव तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पास्ता बनवून खाऊ शकता. होय तुम्ही नीट वाचलात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रोकोली पास्ता देखील बनवता येतो का? तर उत्तर आहे होय! ब्रोकोली पास्ता चवीला खूप चविष्ट असतो आणि सहज बनवता येतो. चला तर मग जाणून घेऊयात ब्रोकोली पास्ता बनवायचा..
३०० ग्रॅम गव्हाचे पीठ
२५० ग्रॅम ब्रोकोली
चवीनुसार मीठ
सॉस बनवण्यासाठी
२५० ग्रॅम चणे
लसूण २ पाकळ्या
२०० ग्रॅम टोमॅटो
१०० ग्रॅम टोमॅटो पेस्ट
इटेलियन हर्ब्स
मीठ
मिरपूड
सर्व प्रथम ब्रोकोली ते मऊ होईपर्यंत उकडून घ्या. नंतर ब्रोकोली चांगली मॅश करा. आता मॅश केलेल्या ब्रोकोली आणि पीठ घालून मळून घ्या. आता पीठ तयार झाल्यावर बाजूला ठेवा. आता पिठाचा गोळा बनवा आणि पास्ता स्टाईलमध्ये कापून घ्या. आता एका कढईत पाणी उकळा आणि त्या उकळत्या पाण्यात तुमचा ब्रोकोली पास्ता टाका. थोडे घट्ट झाल्यावर ते पाण्यातून बाहेर काढा. आता पॅनमध्ये तेल घालून लसूण, चणे, मॅश केलेले टोमॅटो आणि टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घ्या. ते शिजल्यावर ब्रोकोली पास्ता घाला आणि १० मिनिटांनंतर तुमचा ब्रोकोली पास्ता तयार आहे.
संबंधित बातम्या