मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bread Pakora Recipe: बटाट्याशिवाय ब्रेड पकोडा कसा बनवायचा? जाणून घ्या ब्रेकफास्ट रेसिपी

Bread Pakora Recipe: बटाट्याशिवाय ब्रेड पकोडा कसा बनवायचा? जाणून घ्या ब्रेकफास्ट रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 18, 2024 08:08 AM IST

Weekend Recipe: बटाट्याशिवाय ब्रेड पकोडाही बनवू शकता. कसं ते जाणून घेऊयात. ही एक उत्तम विकेंड ब्रेकफास्ट रेसिपी आहे.

How to make bread pakora without potatoes
How to make bread pakora without potatoes (freepik)

Bread pakora without aloo: ब्रेड पकोडे खायला कोणाला आवडत नाही? अनेकांना हा चमचमीत पदार्थ फार आवडतो. अनेकांना हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हवा असतो. पण, अनेक लोकांच्या अनुसार ब्रेड पकोडा हे अनारोग्यकारक असल्याच्या भीतीने खात नाहीत. या रेसिपीमध्ये असलेला बटाटा हा वजन वाढवू शकतो. याच कारणाने लोकांना हा पदार्थ खावासा वाटत असूनही ते खात नाहीत. तुम्हाला फक्त ब्रेड पकोड्यातून बटाट्याचे सारण काढायचे आहे. त्याऐवजी, आपण आरोग्यासाठी चांगले असलेले काहीतरी सारण भरले पाहिजे. हे लक्षात ठेवा की तुम्ही सारण बदलताना त्यात हाय फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या गोष्टी असाव्यात. चला तर मग जाणून घेऊया बटाट्याशिवाय ब्रेड पकोडा बनवण्याची पद्धत.

> भाजीचं स्टफिंग असलेला ब्रेड पकोडा

भाजीच्या सारणासह ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आधी सर्व भाज्या उकळून मग मॅश करा. त्यात काळी मिरी, तिखट, धने, हळद आणि जिरे पावडर घाला. वरून कांदा, हिरवी मिरची, वाटाणे आणि नंतर कोथिंबीर घाला. सर्व काही नीट मिक्स करून ब्रेडच्या मधोमध भरा आणि नंतर बेसन लावून तळून घ्या.

> पनीर ब्रेड पकोडा

पनीर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी तुम्ही पनीर फोडून त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिसळा. नंतर त्यात काळे मीठ, मिरपूड, जिरेपूड आणि नंतर इतर मसाले घाला. आता ते ब्रेडच्या मध्यभागी ठेवा. नंतर त्यावर बेसन लावून तळून घ्या. आता हा ब्रेड पकोडा तुम्ही हिरव्या किंवा लाल चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

> अंड्याचं स्टफिंग असलेला ब्रेड पकोडा

अंड्याचं स्टफिंग भरून ब्रेड पकोडाही बनवू शकता. अंड्यापासून स्क्रॅम्बल्ड एग बनवा. हे स्टफिंग ब्रेडच्या मध्यभागी भरायची आहेत. वरून काही भाज्या घाला आणि नंतर बेसनामध्ये गुंडाळून तळून घ्या. हा ब्रेड पकोडा उच्च ऊर्जा देणारा आहे जो तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग