मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Boondi Ladoo Recipe: बाजारासारखे बुंदीचे लाडू बनवणे नाही अवघड, फक्त जाणून घ्या योग्य रेसिपी!

Boondi Ladoo Recipe: बाजारासारखे बुंदीचे लाडू बनवणे नाही अवघड, फक्त जाणून घ्या योग्य रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 17, 2024 10:53 PM IST

Sweets Recipe: २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आवर्जून तोंड गोड करण्यासाठी बुंदीचे लाडू घरी बनवा.

Boondi Ladu Recipe
Boondi Ladu Recipe (freepik)

Indian Sweets Recipe: २६ जानेवारी अणि २२ जानेवारी दोन्ही दिवशी सगळेच भारतवासी गोड खाणार. २२ जानेवारीला राम मंदिराच्या (ram mandir) प्राणप्रतिष्ठेनिमित्त लोक लाडू वाटणारच. तर २६ जानेवारी (Republic Day) हा सुद्धा आपल्या देशासाठी महत्त्वाचा दिवस आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरी बुंदीचे लाडू बनवू शकता. या दोन्ही प्रसंगी हे लाडू तुम्ही खाऊ शकता, आजूबाजूला वाटू शकता. ही मिठाई बनवायला अवघड आहे असं वाटतं. आता तुम्ही असाही विचार करत असाल की बुंदी लाडू सारखे मिठाई घरी कसे बनवायचे. पण लक्षात घ्या हे लाडू बनवणे अवघड नाही.यासाठी तुम्हाला फारशी वेगळी तयारी करायची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या साहित्याने लाडू तयार होतील. चला तर मग जाणून घेऊया बुंदीचे लाडू बनवण्याची रेसिपी.

लागणारे साहित्य

२ वाट्या बेसन

३ वाट्या साखर

१ वाटी रवा

वेलची

तूप आणि तेल

लाडू बनवण्याचा रंग

जाणून घ्या रेसिपी

सर्वप्रथम २ वाट्या बेसनामध्ये १ वाटी रवा आणि १ वाटी साखर मिक्स करायची आहे. त्यात थोडासा रंग टाकून मिक्स करा. यानंतर पॅन तयार करा आणि त्यात ५ कप पाणी घाला. नंतर त्यात २ वाट्या साखर टाकून त्यात वेलची पूड व हलका रंग टाकून सरबत तयार करा. आता तुम्हाला दुसरे पॅन घ्यायचे आहे आणि त्यात तूप किंवा तेल घालायचे आहे. आता पुरी गाळून घ्या आणि त्यात बेसन घालून तेलात गोल बुंदी तयार करा. आता बुंदी तळून घ्या, बाहेर काढा आणि सिरपमध्ये घाला आणि मिक्स करा. हाताला थोडे तूप लावून लाडू बनवा. तुमचे टेस्टी लाडू तयार आहेत.

WhatsApp channel