मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall Control: कोरड्या, पातळ केसांना दाट करते बायोटिन, हेअर फॉल टाळण्यासाठी असे बनवा घरी

Hair Fall Control: कोरड्या, पातळ केसांना दाट करते बायोटिन, हेअर फॉल टाळण्यासाठी असे बनवा घरी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 30, 2023 12:45 PM IST

Hair Care Tips: बायोटिन हे मुळात पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन बी आहे, जे शरीराला अनेक फायदे देतात. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर करता येतो. याची पावडर घरी कशी बनवावी आणि हे कसे वापरावे ते जाणून घ्या.

हेअर फॉल टाळण्यासाठी होममेड बायोटिन पावडर
हेअर फॉल टाळण्यासाठी होममेड बायोटिन पावडर (unsplash)

Homemade Biotin Powder for Hair Fall: आजकाल प्रत्येकाला केस गळण्याची समस्या आहे. पूर्वी हवामानात बदल झाला की केस गळायचे. पण आजकाल अनेक कारणांमुळे ही समस्या खूप सामान्य झाली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांमध्ये वाढता ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता होणे हे केस गळण्याची प्रमुख कारणे बनले आहेत. अशीच एक कमतरता म्हणजे बायोटिनची. वास्तविक बायोटिनला पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन बी म्हणतात. जे विशेषतः आपली त्वचा, नखे आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते. आहारात बायोटिनच्या कमतरतेमुळे केस पातळ होणे, त्वचा किंवा नखांची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हालाही अशा समस्या असतील तर घरच्या घरी बायोटिन पावडर बनता येते. कसे ते जाणून घ्या.

बायोटिन म्हणजे काय?

बायोटिन हे मुळात पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन बी आहे, जे शरीराला अनेक फायदे देते. केस मजबूत करणे, उन, धूळ आणि प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करणे आणि चमक वाढवणे अशा अनेक गोष्टी बायोटिन करते. केस गळणे, पातळ आणि कोरडे केस यासारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना याचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो.

घरी बायोटिन पावडर बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- अर्धा कप ड्राय फूड पावडर (बदाम, शेंगदाणे, सूर्यफूल बिया आणि अक्रोड)

- अर्धा कप जव आणि ओट्स

- अर्धा कप मूग डाळ आणि चणा डाळ

- अर्धा कप चिया सिड्स

- अर्धा कप फ्लेक्स सिड्स

- अर्धा कप फिश बोन पावडर (ऐच्छिक)

घरी असे बनवा बायोटिन पावडर

घरी बायोटिन पावडर बनवण्यासाठी बदाम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि अक्रोड ग्राइंड करुन त्याची बारीक पावडर बनवा. यानंतर ओट्स आणि बार्ली सुद्धा ग्राइंडरमध्ये बारीक करा. मूग डाळ आणि चणा डाळ कोरडी भाजून बारीक करुन घ्या. फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स ब्लेंडरमध्ये बारीक करा. नॉन व्हेजिटेरियन लोक वाळलेल्या माशांच्या हाडांची पावडर करून घ्यावी. तुम्ही शाकाहरी असाल तर हे स्किप करा. आता एका भांड्यात सर्व घटकांची पावडर एकत्र करा. तुमची बायोटिन पावडर तयार आहे. तुम्ही ते एअर टाईट काचेच्या बॉटलमध्ये भरुन फ्रिजमध्ये ठेवू शकता.

कशी वापरावी बायोटिन पावडर

तुम्ही घरी तयार केलेली ही बायोटिन पावडर तुमच्या आवडत्या स्मूदी किंवा चहामध्ये मिक्स करुन वापरू शकता. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा बायोटिन पावडर मिसळून सुद्धा तुम्ही त्याचे सेवन करू शकता. या बायोटिन पावडरचे सेवन केल्याने केस गळणे थांबते आणि केस दाट होऊ शकतात.

 

टीप - लक्षात ठेवा की वेगवेगळ्या लोकांच्या शरीरात बायोटिनची आवश्यकता देखील भिन्न असते. अशा परिस्थितीत या बायोटिन पावडरचा आहारात समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग