Bihari Style Bhunja Recipe: भुंजा हा बिहारमधील एक प्रसिद्ध पदार्थ आहे, जो स्नॅक्स म्हणून खाल्ला जातो. भुंजा म्हणजेच मुरमुरे, चणे आणि शेंगदाणे यांसारख्या गोष्टी एकत्र करून बनवला जातो. मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते हेल्दी स्नॅक पर्याय आहे. तुम्हाला संध्याकाळच्या वेळी काहीतरी खायचे आहे पण बनवण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे लगेच तयार करू शकता. जंक फूड टाळायचे असेल तर हा चटपटीत नमकीन नाश्ता खा. हे तुमची क्रेविंग शांत करेल आणि पोटही भरेल. चला तर मग जाणून घ्या बिहारी स्टाईल भुंजाची रेसिपी.
- ४ वाट्या मुरमुरे
- मूठभर फुटाणे
- ४ चमचे भिजवलेले हरभरे
- ४ चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा खरमुरे
- २ चमचे कॉर्न
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेला टोमॅटो
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- काळे मीठ चवीनुसार
- अर्धा टीस्पून जिरे पूड
- १ टीस्पून मोहरीचे तेल
- १ टीस्पून लोणच्याचा मसाला
- १ टीस्पून हिरवी चटणी
- कोथिंबीर
- चवीनुसार साधे मीठ
सर्वप्रथम एका बाउलमध्ये मुरमुरे घ्या. नंतर त्यात फुटाणे, भिजवलेले हरभरे आणि भाजलेले शेंगदाणे किंवा खरमुरे घाला. नंतर त्यात काळे मीठ, साधे मीठ, जिरेपूड, मोहरीचे तेल, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लोणच्याचा मसाला, हिरवी चटणी घालून मिक्स करा. नंतर त्यावर कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा. तुमचा टेस्टी नाश्ता तयार आहे.
संबंधित बातम्या