मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Recipe: स्टफ्ड भाजी बनवायला वेळ लागतो का? झटपट तयार करण्यासाठी आधीच बनवून ठेवा मसाला, पाहा रेसिपी

Masala Recipe: स्टफ्ड भाजी बनवायला वेळ लागतो का? झटपट तयार करण्यासाठी आधीच बनवून ठेवा मसाला, पाहा रेसिपी

Jun 26, 2024 07:39 PM IST

Masala Recipe: अनेक वेळा नेहमीच्या भाज्यांचा कंळाटा आला तर स्टफ्ड भाजी बनवली जाते. तुम्हाला भाजी झटपट बनवायची असेल तर हा मसाला आधीच बनवून ठेवा.

स्टफ्ड भाजीचा मसाला रेसिपी
स्टफ्ड भाजीचा मसाला रेसिपी (freepik)

Bharwa Masala Recipe: हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चांगल्या आरोग्यासाठी ते खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीर सक्रिय राहते आणि चयापचयही वाढू लागते. पण अनेक वेळा हिरव्या भाज्या पाहून घरातील लहान मुलांप्रमाणेच मोठे देखील नाक मुरडतात. मात्र त्यात मसाले भरून बनवले तर त्याची चव आणखी चांगली होईल. भेंडी, टिंडे, दुधी भोपळा, परवळ अशा भाज्या त्यात सारण भरून तयार केल्या जातात. अशा तऱ्हेने स्टफ्ड भाज्यांसाठी घरी मसाला कसा तयार करायचे ते जाणून घ्या. हा मसाला आधी बनवून ठेवला तर तुमची भाजी सुद्धा लवकर तयार होईल. जाणून घ्या कसा बनवायचा स्टफ्ड भाजीचा मसाला.

स्टफ्ड भाजीचा मसाला बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २ चमचे जिरे

ट्रेंडिंग न्यूज

- २ चमचे मेथी

- १० ते १२ लवंगा

- काळी मिरी

- अर्धा चमचा बडीशेप

- अर्धा चमचा हिंग

- २ ते ३ इंच दालचिनी

- १ टीस्पून काळी मिरी

- १ टीस्पून धणे

- २ चमचे आमचूर पावडर

- १ टीस्पून हळद

- १०-१२ मोठी वेलची

मसाला बनवण्याची पद्धत

स्टफ्ड भाजीसाठी मसाला बनवण्यासाठी आधी सर्व मसाले उन्हात वाळवून मग गॅसवर कढईत ठेवा. आता सर्व मसाले मंद आचेवर भाजून घ्या. आता ते थंड झाल्यावर ग्राइंडरमध्ये थोडं जाडसर बारीक करून घ्या. तुमचा मसाला तयार आहे. आता हे हवा बंद डब्यात ठेवा.

हा मसाला वापरण्यासाठी सर्वप्रथम आपण बनवत असलेली कोणतीही भाजी धुवून पुसून घ्या. नंतर मध्यभागी चीर लावा. आता हा मसाला एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घाला. आता ही पेस्ट भाज्यांच्या आत भरून घ्या. तेलात तळून तुमची भाजी तयार करा.

WhatsApp channel
विभाग