Besan Toast Recipe: रोज सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतो. त्यातही जर नाश्ता बनवण्यासाठी फारसा वेळ नसतो त्यावेळी ही मोठी समस्या वाटते. तुम्हाला सुद्धा काहीतरी झटपट बनवायचे असेल तर तुम्ही बेसन टोस्ट बनवू शकता. हे झटपट तयार होते आणि खायला सुद्धा टेस्टी आहे. विशेष म्हणजे हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला तर मग जाणून घ्या कसे बनायचे बेसन टोस्ट
- बेसन - १ कप
- ब्रेड स्लाइस
- कांदा - १/४ कप
- टोमॅटो - १/४ कप
- शिमला मिरची -१/४ टीस्पून
- हिरवी मिरची- २-३
- कोथिंबीर
- ओवा
- लाल तिखट - १ टीस्पून
- चाट मसाला - १/२ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- मीठ चवीनुसार
हा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या. नंतर ते बारीक चिरून बाजूला ठेवा. आता एका बाउलमध्ये बेसन घ्या. त्यात लाल तिखट, चाट मसाला, हळद, मीठ घाला. प्रथम हे कोरडे मिक्स करा आणि नंतर त्यात पाणी घालून नीट मिसळत राहा. लक्षात ठेवा की पाणी थोडे थोडे घालावे लागेल. यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. हे बॅटर खूप पातळ किंवा जास्त घट्ट नसावे याची काळजी घ्या. नंतर त्यात सर्व भाज्या मिक्स करा. आता त्यात ब्रेड स्लाइस बुडवून घ्या. ब्रेडच्या दोन्ही बाजूने बेसन नीट कोट करा. आता ही ब्रेड स्लाइस गरम तव्यावर किंवा पॅनमध्ये ठेवा. त्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. हे भाजताना गॅसची फ्लेम जास्त नसावी हे लक्षात ठेवा. दोन्ही बाजूंनी भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.