Doi Murgi Recipe: नॉनव्हेज लव्हर्स ट्राय करू शकतात बंगाली रेसिपी दोई मुर्गी, वीकेंड होईल सुपर टेस्टी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Doi Murgi Recipe: नॉनव्हेज लव्हर्स ट्राय करू शकतात बंगाली रेसिपी दोई मुर्गी, वीकेंड होईल सुपर टेस्टी

Doi Murgi Recipe: नॉनव्हेज लव्हर्स ट्राय करू शकतात बंगाली रेसिपी दोई मुर्गी, वीकेंड होईल सुपर टेस्टी

Jun 29, 2024 12:55 PM IST

Weekend Special Recipe: दोई मुर्गी ही एक बंगाली चिकन करी आहे जी साधी दही आणि मिष्टी दोई तसेच निवडक मसाल्यांसह बनवली जाते. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.

बंगाली स्टाईल दोई मुर्गी रेसिपी
बंगाली स्टाईल दोई मुर्गी रेसिपी

Bengali Style Doi Murgi Recipe: संपूर्ण आठवड्याच्या थकव्यानंतर जर तुम्हाला घरी राहूनच तुमचा वीकेंड मजेदार करायचा असेल तर ही बंगाली रेसिपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडते त्यांना दोई मुर्गीची चव आवडेल. दोई मुर्गी ही एक बंगाली चिकन करी आहे जी साधी दही आणि मिष्टी दोई तसेच निवडक मसाल्यांसह शिजवली जाते. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया ही सुपर टेस्टी दोई मुर्गी रेसिपी कशी बनवायची.

बंगाली स्टाईल दोई मुर्गी बनवण्यासाठी साहित्य

चिकन मॅरिनेशनसाठी

- १ किलो बोनलेस चिकनचे तुकडे

- २ मध्यम आकाराचे बटाटे चिरलेले

- १ वाटी दही

- १ टेबलस्पून लिंबाचा रस

- १ चमचा आले लसूण पेस्ट

- २ चमचे मीठ

ग्रेव्ही बनवण्यासाठी

- ५ चमचे मोहरीचे तेल

- ३-४ लवंग

- २ काळी वेलची जाडसर बारीक

- २ तमालपत्र

- ४-५ संपूर्ण सुक्या लाल मिरच्या

- दीड कप पातळ चिरलेला कांदा

- १ चमचा चिरलेला आले

- १०-१२ पाकळ्या लसूण

- दीड चमचा धने पावडर

- १ चमचा गरम मसाला

- २ चमचे काश्मिरी लाल तिखट

- मीठ चवीनुसार

बंगाली स्टाईल दोई मुर्गी बनवण्याची पद्धत

चिकन मॅरिनेट करण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात चिकन, बटाटे, दही, लिंबाचा रस, आले लसूण पेस्ट आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. आता हे झाकून फ्रिजमध्ये किमान २ तास ठेवावे.

आता दोई मुर्गी करी बनवण्यासाठी सर्वप्रथम मध्यम आचेवर कढईत मोहरीचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात लवंग, मोठी वेलची, तमालपत्र आणि लाल मिरची घालून ४-५ सेकंद परतून घ्या. त्यानंतर कढईत कांदा घालून सतत ढवळत ६-८ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर कढईत आले आणि लसूण घालून सतत ढवळत २ मिनिटे परतून घ्या. आता त्यात धणे पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट घालून १५-२० सेकंद शिजवावे. कढईत मॅरिनेट केलेले चिकन घाला आणि चांगले मिक्स करा.

गॅसची फ्लेम मंद करा. आता कढई झाकणाने झाकून मध्यम- मंद आचेवर ४०-४५ मिनिटे चिकन चांगले शिजेपर्यंत शिजवावे. मध्ये मध्ये चिकन सतत ढवळा. तुम्हाला करी घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात एक कप पाणी सुद्धा घालू शकता. मीठ तपासून घ्या. तुमची टेस्टी दोई मुर्गी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner