Beetroot Recipes: बीटरूट ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये भरपूर पौष्टिकता असते. पण मुलांप्रमाणेच मोठ्यांना सुद्धा ते खायला आवडत नाही. अनेक लोकांना सलाद मध्ये बीटरूट खायचा कंटाळा येतो. त्याची चव थोडी गोड असते. या लाल रंगाच्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. रक्ताची कमतरता असलेल्या, अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी बीटरूट खूप फायदेशीर असते. तुम्हाला सलादमध्ये बीटरूट खायचे नसेल तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करण्यासाठी या २ रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या.
- १/२ कप चिरलेली बीटरूट
- १/२ कप चिरलेली कोथिंबीर
- १/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
- २ चिरलेली मिरची
- १ चमचा लिंबाचा रस
- पाणी आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
ग्राइंडरमध्ये बीटरूट, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून बारीक करा. आता लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून आणखी २० सेकंद बारीक करा. एका भांड्यात चटणी काढा. तुमची चटणी तयार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यावर तेल आणि जिऱ्याचा तडका देऊ शकता.
- १ बीटरूट
- ३ कप पाणी
- चवीनुसार मीठ
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- १ टीस्पून जिरे
- १ टीस्पून संपूर्ण धणे
- ४ सुक्या लाल मिरची
- ४ पाकळ्या लसूण
- कोथिंबीर १ टीस्पून
- कढीपत्ता
- १ टीस्पून तेल
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जिरे
- १ सुकी लाल मिरची
- कढीपत्ता
- चिमूटभर हिंग
बीटरूट सोलून कापून घ्या. बीटरूटमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि कुकरमध्ये ठेवा. कुकर बंद करून दोन शिट्ट्या घ्या. कुकरचा प्रेशर स्वतःच निघू द्या. पावडरसाठी असलेले साहित्य ब्लेंडरमध्ये ठेवा आणि बारीक करून घ्या. आता कढईत मसाले, बीटरूट आणि त्याचे पाणी घाला. हे मिश्रण १० ते १२ मिनिटे शिजवा. नंतर गॅस बंद करा. आता एका कढईत तेल गरम करा. त्यात तडक्यासाठी असलेले साहित्य टाका आणि १५ सेकंद शिजू द्या. हा तडका तयार रस्सममध्ये घाला. कोथिंबीरीने सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा
संबंधित बातम्या