Healthy Cold Drink: उन्हाळ्यात सतत काही ना काही थंड खावं आणि प्यावंसं वाटतं. अनेक लोक अशावेळी लोक कोल्ड ड्रिंक्स किंवा रसायने असलेली पेये पिण्यास सुरुवात करतात. ही अशी पेय टेस्टी असली तरी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पण उन्हाळ्यात तुम्ही दह्यापासून अनेक प्रकारचे पेय बनवू शकता जे चवदार आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पेयाबद्दल सांगणार आहोत, जे प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होईल. तुम्ही मसाला ताक आणि साधे ताक बद्दल ऐकले असेलच. पण तुम्ही बीट ताकाबद्दल ऐकले आहे का? नसेल ऐकले तर आज आम्ही तुम्हाला ते बनवण्याबद्दल आणि त्याचे फायदे याबद्दल सांगणार आहोत. ते बनवायला जास्त वेळ लागणार नाही. यासाठी एक अतिशय सोपी रेसिपी आहे.
१ कप दही
१ बीट
१ कप पाणी
१ टीस्पून खडे मीठ
१ टीस्पून जिरे पावडर
काही बर्फाचे तुकडे
> बीटचे ताक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दही, बीट, पाणी, खडे मीठ, जिरे पावडर एकत्र करून चांगले मिसळा. तुमचे बीटरूट ताक तयार आहे. ते थंड करण्यासाठी तुम्ही त्यात बर्फाचे तुकडे देखील टाकू शकता.
> उन्हाळ्यासाठी थंड ताक तयार आहे. हे तुम्ही तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही देऊ शकता. या ताकाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. तुम्ही तुमच्या पाहुण्यांना तुमच्या स्वतःच्या पेयांमध्ये मिसळून त्यांचे आरोग्य सुधारू शकता.
बीट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी६ आणि फोलेट असते. यांचं सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कोलेजनची पातळी नैसर्गिकरित्या वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. बीट ताक प्यायल्याने त्वचा चमकदार होते. जर तुम्ही याचे रोज सेवन केले तर तुम्हाला त्याचा प्रभाव १५ दिवसात दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या