Beetroot Cutlet: नाश्त्यात बनवा टेस्टी बीटरूट कटलेट, आठवड्याची करा हेल्दी सुरुवात
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beetroot Cutlet: नाश्त्यात बनवा टेस्टी बीटरूट कटलेट, आठवड्याची करा हेल्दी सुरुवात

Beetroot Cutlet: नाश्त्यात बनवा टेस्टी बीटरूट कटलेट, आठवड्याची करा हेल्दी सुरुवात

Apr 01, 2024 09:31 AM IST

Breakfast Recipe: आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी बीटरूट खायला मुलं कंटाळा करतात. त्यांना हेल्दी नाश्ता द्यायचा असेल तर बीटरूटचे कटलेट बनवू शकता. पाहा सोपी रेसिपी.

बीटरूट कटलेट
बीटरूट कटलेट (freepik)

Beetroot Cutlet Recipe: सकाळचा नाश्ता टेस्टी असण्यासोबतच हेल्दी देखील असावा असे प्रत्येक घरातील महिलेला वाटते. त्यासाठी रोज विविध पदार्थ बनवले जातात. तुम्हाला सुद्धा नाश्त्यात काही हेल्दी बनवायचे असेल तर तुम्ही बीटरूटचे कटलेट बनवू शकता. हे कटलेट खायला टेस्टी असण्यासोबतच आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला सोपी आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या बीटरूट कटलेस कसे बनवायचे.

बीटरूट कटलेट बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- बीटरूट किसलेले

- कॉर्न फ्लोअर

- मैदा

- कांदा बारीक चिरलेला

- बटाटा मॅश केलेला

- आले लसूण पेस्ट

- ब्रेड क्रम्ब्स

- काळी मिरी बारीक केलेली

- लाल तिखट

- हळद

- गरम मसाला

- आमचूर पावडर

- चाट मसाला

- जिरेपूड

- कोथिंबीर बारीक चिरलेली

- तेल

- मीठ चवीनुसार

- पाणी

असे बनवा बीटरूट कटलेट

टेस्टी बीटरूट कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम बीटरूट किसून त्याचा रस एका मोठ्या भांड्यात पिळून घ्या. नंतर त्यात उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घाला. आता त्यात कांदा आणि सर्व मसाले घाला. त्यात थोडे ब्रेड क्रम्ब्स आणि कोथिंबीर टाका. हे सर्व चांगले मिक्स करा. सर्व मसाले चांगले मिसळले जातील याची काळजी घ्या. आता या तयार बीटरूट पिठापासून कटलेट तयार करा. नंतर हे तयार कटलेट कॉर्न फ्लोअरच्या पिठात बुडवून दोन्ही बाजूंनी कोट करा. नंतर ब्रेड क्रम्ब्सला दोन्ही बाजूंनी रोल करा. गरम तेलात कटलेट तळून घ्या. तुम्ही हे कटलेट डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा पॅन फ्राय देखील करू शकता. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तुमचे बीटरूट कटलेट तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner