Home Remedies: आयुर्वेदिक तेल नेहमीच फायदेशीर ठरते. केसांसाठी केमिकयुक्त उत्पादने वापरल्यास उलटे परिणाम होतात. तुम्ही केसांसाठी तुळशीचे तेल वापरू शकता. हे तेल केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे तेल बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आहे. जेव्हा तुम्ही हे तेल टाळूला लावता तेव्हा ते टाळूचे पोर्स ओपन होतात आणि रक्ताभिसरण वाढते. याशिवाय ज्या लोकांचे केस वेगाने गळत आहेत त्यांच्यासाठी तुळशीचे तेल फायदेशीर आहे. याशिवाय केसांना हे तेल लावल्याने कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्याही कमी होण्यास मदत होते. याशिवाय या तेलाचे अनेक प्रकारे फायदे होतात. पण हे तेल नक्की कसे बनवायचे याबद्दल जाणून घ्या. याशिवाय याचे इतर फायदेही जाणून घ्या.
तुळशीचे तेल बनवण्यासाठी तुळशीची पाने आणि बिया घ्या. नंतर या पाने आणि बिया मोहरीच्या तेलात मिसळून चांगले शिजवून घ्या. नंतर ते तुमच्या टाळूवर लावा आणि काही वेळ हलक्या हाताने मसाज करा. एक रात्र असेच राहू द्या आणि नंतर केस धुवा.
कोंडा घालवण्यासाठी तर हे तेल फारच उपयुक्त आहे. हे टाळू स्वच्छ करते. यामुळे खाज आणि कोरडेपणा कमी होतो. याशिवाय पिंपल्स कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते. एवढेच नाही तर केसांना तुळशीचे तेल लावल्याने उवांची समस्याही कमी होण्यास मदत होते. या सर्व कारणांसाठी हे तेल केसांना लावावे.
तुळशीचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. हे तेल टाळूमध्ये रक्तपरिसंचरण सुधारते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. हे केसांना मुळांपासून मजबूत करते ज्यामुळे केस गळणे थांबते. याशिवाय केसगळतीपासूनही संरक्षण मिळते. त्यामुळे केसांना तुळशीचे तेल लावा आणि आपल्याला हवी तेवढी केसांची वाढ होऊ द्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या