मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Banana Raita: काकडी, बुंदी नाही तर यावेळी बनवा केळीचा रायता, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Banana Raita: काकडी, बुंदी नाही तर यावेळी बनवा केळीचा रायता, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Jun 25, 2024 12:52 PM IST

Raita Recipe: केळीचा रायता खायला खूप चविष्ट तर असतोच पण बनवायलाही खूप सोपा असतो. जाणून घेऊया केळीचा रायता कसा बनवायचा.

केळीचा रायता
केळीचा रायता

Banana Raita Recipe: जेवणासोबत लोणचं, चटणी, रायता असे प्रकार जेवणाची चव वाढवतात. अनेक लोकांना रोज रायता खायची सवय असते. रायताशिवाय जेवण अपूर्ण झाल्यासारखे वाटते. तुम्हाला सुद्धा रायता खायला आवडत असेल पण नेहमीचे काकडी आणि बूंदीचा रायता खायचा नसेल तर यावेळी केळीचा रायता बनवून पाहा. हे रायला फक्त खायला टेस्टी नाही तर हेल्दी देखील आहे. केळीचा रायता खायला खूप चविष्ट तर असतोच पण बनवायलाही खूप सोपा आहे. झटपट तयार होणारा केळीचा रायता कसा बनवायचा हे जाणून घ्या.

केळीचा रायता तयार करण्यासाठी साहित्य

- १ केळी

ट्रेंडिंग न्यूज

- २ कप दही

- अर्धा चमचा भाजलेली मोहरीची पावडर

- अर्धा चमचा साखर

- २ चिरलेली हिरवी मिरची

- मीठ चवीनुसार

- कोथिंबीर आवश्यकतेनुसार

केळीचा रायता बनवण्याची पद्धत

केळीचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम केळी कापून बाजूला ठेवा. यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये दही आणि इतर सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा. आता या रायताच्या वर केळीचे तुकडे आणि कोथिंबीर घाला. तुमचे टेस्टी केळीचा रायता तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर जेवणासोबत थंडगार सर्व्ह करा.

WhatsApp channel