मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Banana Muffins Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा केळीचे मफिन्स, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Banana Muffins Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा केळीचे मफिन्स, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 31, 2024 08:14 PM IST

Banana Snacks: केळीचे मफिन्स हे चविष्ट स्नॅक्स ऑप्शन आहे. याची रेसिपी जाणून घ्या.

how to Make Banana Muffins
how to Make Banana Muffins (freepik)

Banana Snacks at Home: केळी हे वर्षभर मिळणारे फळ आहे. अनेकांना हे फळ आवडत. केळी अशीच खाल्ली जाते पण याशिवाय त्याच्यापासून वेगवगेळ्या रेसिपीही बनवल्या जातात. तुम्ही अनेकदा केळीचा शेक प्यायला असेल. तुम्ही कच्च्या केळ्याची भाजीही खाल्ली असेल. पण या रेगुलर रेसिपी सोडून आज आम्ही तुम्हाला एका अतिशय टेस्टी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही केळीचे मफिनची बनवू शकता. ही रेसिपी बनवायला तुमचा जास्त वेळ लागणार नाही. केळी मफिन हा अतिशय टेस्टी स्नॅक्स ऑप्शन आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही ही रेसिपी आवडेल. चला जाणून घेऊया हे मफिन्स कसे बनवायचे.

लागणारे साहित्य

२ कप मैदा

२ १/२ टीस्पून बेकिंग पावडर

१/२ कप बटर

दीड कप पिठीसाखर

१ कप मॅश केलेले केळी

१/४ कप अक्रोड (चिरलेला)

३ अंडी

१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स

१/४ टीस्पून मीठ

जाणून घ्या रेसिपी

> सर्व प्रथम, ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करा.

> आता एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा.

> एक वेगळी वाटी घ्या आणि त्यात बटर आणि साखर पावडर दोन्ही नीट मिसळेपर्यंत फेटून घ्या.

> आता पिठात एक एक करून अंडी फोडून नीट फेटून घ्या.

> यानंतर बाऊलमध्ये व्हॅनिला इसेन्स आणि मॅश केलेली केळी घाला आणि चांगले मिक्स करा.

> आता या पिठात पिठाचे साहित्य मिसळा आणि चमच्याने चांगले मिसळा.

> मफिन कपमध्ये पीठ (बॅटर) घाला आणि २/३ भरा आणि त्यावर अक्रोड घाला.

> २०-२५ मिनिटे बेक करा.

> मफिन्स पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा.

WhatsApp channel