मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Recipe: नाश्त्यात झटपट बनवा बाजरीचे अप्पम, दिवसाची टेस्टी सुरुवात करेल ही रेसिपी

Breakfast Recipe: नाश्त्यात झटपट बनवा बाजरीचे अप्पम, दिवसाची टेस्टी सुरुवात करेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 11, 2024 10:24 AM IST

Healthy Breakfast Recipe: हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण जर तुम्हाला बाजरीची भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी त्याचे टेस्टी अप्पम बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे.

बाजरीचे अप्पम
बाजरीचे अप्पम (freepik)

Bajra Appe or Appam Recipe: हिवाळ्यात बाजरी आणि मका खाणे खूप फायदेशीर म्हटले जाते. पण जर तुम्हाला बाजरीची भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी तुम्ही बाजरीपासून टेस्टी नाश्ता बनवू शकता. तुम्ही नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी बनवण्याचा विचार करत असाल तर बाजरीचे अप्पम किंवा अप्पे हा एक बेस्ट पर्याय आहे. विशेषतः मुलांच्या आहारात बाजरीचा समावेश करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तसेच ते काही मिनिटांत तयार होतील. चला तर मग रविवारची हेल्दी आणि टेस्टी सुरुवात करण्यासाठी बाजरीचे अप्पम कसे बनवायचे ते पाहा

बाजरीचे अप्पम बनवण्यासाठी साहित्य

- १ वाटी बाजरीचे पीठ

- अर्धी वाटी रवा

- १ वाटी दही

- १ चमचा फ्रूट सॉल्ट

- बारीक चिरलेला कांदा

- १ गाजर किसलेले

- हिरवे वाटाणे

- चवीनुसार मीठ

बाजरीचे अप्पम बनवण्याची पद्धत

हे अप्पम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये बाजरीचे पीठ घ्या. नंतर अर्धा कप रवा आणि दही टाकून नीट मिक्स करा. नंतर त्यात थोडेसे पाणी घालून ढवळावे. लक्षात ठेवा की पाणी एकाच वेळी टाकून नका. तर हळूहळू पाणी घाला आणि नंतर फेटत रहा. जेणेकरून पीठात गुठळ्या होणार नाही आणि पीठ गुळगुळीत होईल. अप्पमसाठी पीठ बनवताना ते जास्त घट्ट किंवा पातळ नको. आता हे बॅटर सुमारे अर्धा तास सेट करण्यासाठी बाजूला ठेवा. अर्ध्या तासानंतर बाजरीच्या अप्पमच्या पिठात अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालून हलके मिक्स करा. ते जास्त फेटण्याची गरज नाही. आता या पिठात बारीक चिरलेला कांदा, गाजर आणि मीठ घाला. हिरवे वाटाणे ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर हे देखील अप्पमच्या पिठात घाला. आता अप्पम पॅनला थोडे थोडे तेल घालून ग्रीस करा. नंतर पॅनमध्ये तयार केलेले मिश्रण थोडे थोडे टाका आणि मंद आचेवर सुमारे ६-७ मिनिटे शिजवा. 

एका बाजूने शिजल्यावर झाकण काढून दुसऱ्या बाजूने पलटवा. आता झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेही शिजवा. तुमचे टेस्टी आणि हेल्दी अप्पम तयार आहे. गरमा गरम अप्पम खोबऱ्याची चटणी सोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel