Sound Sleep for Baby: नवजात बालकांपासून ते एक वर्षापर्यंत मुलांची झोपण्याचे आणि उठण्याचे रुटीन खूप वेगळे असते. ते रात्री कधीही झोपेतून उठतात आणि नंतर झोपतात. पण जेव्हा मुल एक वर्षाचे होऊनही रात्री जागे राहते किंवा मध्यरात्री खेळायला लागते तेव्हा त्याच्या गाढ झोपेची व्यवस्था करणे गरजेचे असते. जेणेकरून त्याला झोपताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि तो रात्री आरामात झोपू शकेल. मूलाची झोप नीट होण्यासोबतच आईला देखील आराम मिळेल. मुलांची झोप नीट झाली तर मुले दिवसा चिडचिड करणार नाहीत. जाणून घ्या मुलांची झोप नीट होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या.
रात्री झोपणे महत्वाचे आहे. केवळ आईसाठीच नाही तर मुलासाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहे. म्हणून मुलाच्या आयुष्याच्या एक वर्षानंतरच रात्री पूर्ण झोप घेण्याची सवय लावा. यामुळे मूल सकाळी फ्रेश मूडमध्ये उठेल आणि रडण्याऐवजी किंवा चिडचिड करण्याऐवजी खेळेल. मुलाला रात्री चांगली झोप लागावी यासाठी या गोष्टी पाळणे गरजेचे आहे.
मुले दिवसभरात अनेकदा खेळण्यात व्यस्त असतात आणि कमी खातात. झोपायची वेळ झाली की मग ते खायला मागतात. किंवा कधी कधी आई झोपेच्या वेळी त्यांना खायला घालू लागते. असे केल्याने मुलाची पचनक्रिया सक्रिय राहते आणि मूलाला झोप येणार नाही किंवा नीट झोपू शकणार नाही. झोपण्याच्या सुमारे दोन तास आधी मुलाला खाऊ देऊ नका. त्याऐवजी त्याला कोमट दूध प्यायला द्या. यामुळे मुलाला झोप येण्यास मदत होईल आणि तो आरामात झोपेल.
दिवसभर मुलाला पाणी देत राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तो हायड्रेटेड राहील. यामुळे रात्री पाणी पिण्याची गरज कमी होईल. मुलाने रात्री खूप पाणी प्यायल्यास त्याला वारंवार लघवी करावी लागते आणि त्याची झोपमोड होते.
तुमच्या मुलाला झोपण्यापूर्वी लघवी केली असल्याची खात्री करा. त्याला रोज झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये लघवी करण्याची सवय लावा. यामुळे झोपल्यानंतर लघवीमुळे मुलाची झोप खराब होणार नाही आणि तो गाढ झोपेल.
रात्री झोपण्यापूर्वी मुलाचे शरीर आणि मन रिलॅक्स करणे महत्वाचे आहे. म्हणून २-३ वर्षांच्या मुलासाठी देखील मालिश करणे आवश्यक आहे. हात आणि पायांची चांगली मालिश करा. जेणेकरून मुलाला रिलॅक्स फील करेल आणि तो गाढ झोपेल.
मुलाला संपूर्ण दिवस घरी खेळण्याऐवजी काही तासांसाठी बाहेर पार्कमध्ये घेऊन जा. आउटडोअर अॅक्टिव्हिटी करायला सांगा. यामुळे मुले शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहतील आणि रात्री शांत झोप घेतील.
मुलाचा पलंग कंफर्टेबल ठेवा. जिथे मंद प्रकाश असतो आणि ऋतूनुसार तापमान संतुलित असते. हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात किंचित थंड. जेणेकरून मुलाला गरम किंवा थंड वाटणार नाही. तसेच बेड स्वच्छ आणि मुलाचे कपडे आरामदायक असावेत. जेणेकरून त्याच्या झोपेत कोणताही अडथळा येणार नाही. यामुळे मुलाला गाढ झोप लागेल आणि तो पुन्हा पुन्हा उठणार नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)