मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Corn Soup Recipe: हिवाळ्यात बेबी कॉर्न सूप आहे फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी!

Baby Corn Soup Recipe: हिवाळ्यात बेबी कॉर्न सूप आहे फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 17, 2024 09:20 AM IST

Breakfast Recipe: हिवाळ्यात बेबी कॉर्न सहज उपल्बध असते. हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याचे नाश्त्यात आवर्जून सूप बनवून प्या.

Healthy Soup Recipe
Healthy Soup Recipe (freepik)

Restaurant style sweet corn soup recipe: अनेक रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये बेबी कॉर्नचा सूप समाविष्ट असतो. हि रेसिपी एक हेल्दी पर्याय आहे. बेबी कॉर्न हा कॉर्नचा एक छोटासा प्रकार असतो. मोठ्या कॉर्नप्रमाणेच त्यातही अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे आपल्या शरीराच्या अनेक प्रकारे आवश्यक असतात. पण अनेक वेळा बेबी कॉर्न नक्की कसे खावे? त्याच्यापासून काय बनवावे हे समजत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा दोन रेसिपींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही घरी सहज तयार करू शकता.

लागणारे साहित्य

१०० ग्रॅम (२ ते ३ तुकडे) बेबी कॉर्न, १ इंच किसलेले आले, ३ ते ४ लसूण पाकळ्याचे तुकडे, १/४ कप चिरलेली कोबी, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ चमचे चिरलेली शिमला मिरची, २ चमचे चिरलेली मश, १/२ टीस्पून काळी मिरी, १ टीस्पून सोया सॉस, २ ते ३ चमचे कॉर्न फ्लोअर, मीठ (चवीनुसार), १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल

असे सूप बनवा

> पॅन गरम करा. आले, लसूण, हिरवी मिरची घालून सुगंध येईपर्यंत परतून घ्या.

> पॅनमध्ये कॉर्न आणि इतर सर्व भाज्या घाला. वर मीठ आणि मिरपूड घाला आणि ३० ते ४० सेकंद तळा.

> अर्धा कप पाण्यात कॉर्न फ्लोअर चांगले मिसळा.

> पॅनमध्ये सोया सॉस घाला आणि नंतर कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घाला.

> आता त्यात २ ते ३ कप पाणी घालून गॅसची आच कमी करा. ३ ते ४ मिनिटे उकळू द्या.

> तीळाने सजवा आणि सर्व्ह करा.

क्रिस्पी बेबी फिंगर्स

बेबी कॉर्न - २५० ग्रॅम, तांदळाचे पीठ - १/४ कप, बेसन - १/४ कप, काळी मिरी (जाडसर वाटलेली) - १/२ टीस्पून, जिरे पावडर - १/२ टीस्पून, लाल तिखट - १/४ चमचे, आले आणि लसूण पेस्ट - १ चमचा, मीठ (चवीनुसार), ऑलिव्ह ऑईल

जाणून घ्या रेसिपी

> बेबी कॉर्न मऊ होईपर्यंत पाण्यात उकळवा.

> थोडे थंड झाल्यावर त्याचे दोन लांबट तुकडे करा.

> एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि बेसन घाला. मीठ, तिखट, मिरपूड, जिरेपूड, आले आणि लसूण पेस्ट घालून मिक्स करा.

> आवश्यकतेनुसार पाणी घाला. पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.

> त्यात बेबी कॉर्न टाका. चांगले कोट करा.

> कढईत तेल गरम करून तळून घ्या. जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही त्यात हेल्दी पद्धतीने शिजवू शकता.

> हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

 

WhatsApp channel