Easy Trick to Make Atta Noodles: मुले अनेकदा जंक फूडची मागणी करतात आणि घरी बनवलेले पदार्थ खाण्यास नाकारतात. अनेक मुलांना पोळी खायचीही इच्छा नसते. जर तुमचं मूलही मॅगी, पास्ता सारख्या गोष्टींची मागणी करत असेल तर त्याला घरगुती पिठापासून बनवलेले नूडल्स खायला द्या. हे आटा नूडल्स खाण्यास निरोगी आणि चविष्ट देखील आहेत. तसेच हळूहळू मुलाची सतत इन्स्टंट नूडल्स खाण्याच्या सवयीपासून सुटका होईल. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी घरी इन्स्टंट आटा नूडल्स बनवण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे. येथे जाणून घ्या.
घरी आटा नूडल्स बनविणे खूप सोपे आहे. फक्त पोळीचे पीठ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या साहाय्याने पोळी लाटून घ्या. नंतर कढईत पाणी घालून गरम करावे. पाणी गरम झाल्यावर तयार केलेली पोळी साधारण ३० ते ४० सेकंद पाण्यात शिजू द्या. नंतर पाण्यातून बाहेर काढून थंड होऊ द्या. थोडी थंड व्हायला लागल्यावर ही पोळी अगदी पातळ तुकड्यात कापून घ्या. नूडल्ससारखे लांब लांब कापा. आता या तयार झालेल्या आटा नूडल्सवर थोडे तेल शिंपडून मिक्स करून घ्या. जेणेकरून ते तुटणार नाहीत. तुमचे आटा नूडल्स तयार आहेत. हे नूडल्स बनवण्याची रेसिपीही नोट करून घ्या.
सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. सोबत बारीक चिरलेले आले घालावे. गाजर, शिमला मिरची, कांदा एकत्र बारीक चिरून घ्या. हलके शिजवून त्यात सोया सॉस, व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस घाला. त्यात एक चमचा चिली सॉस घालून मिक्स करून तयार नूडल्स टाका आणि मिक्स करा. तुम्ही यात मुलांच्या आवडीच्या इतर भाज्या सुद्धा टाकू शकता. तुमचे टेस्टी आटा नूडल्स तयार आहे. लहान मुलांना हे नक्कीच आवडतील आणि मुले हे खाण्याची नेहमी मागणी करतील.