Apple Pudding Recipe: जर तुम्हाला जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडत असतील तर यावेळी नवीन रेसिपी ॲपल पुडिंग ट्राय करा. ॲपल पुडिंग ही एक उत्तम डेझर्ट आहे जी सफरचंद, दालचिनी पावडर आणि लोणीच्या मदतीने तयार केली जाते. ही स्वादिष्ट पुडिंग रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. ही रेसिपी फक्त खायला टेस्टी नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. ही डेझर्ट रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय केली पाहिजे. चला तर जाणून घ्या कसे बनवायचे ॲपल पुडिंग
- सफरचंद - २
- बटर - १ चमचा
- कॉर्न फ्लोर - २ चमचे
- कॉर्न फ्लेक्स - १ चमचा
- साखर - १ चमचा
- मैदा- २ चमचे
- बेकिंग सोडा - १ चमचा
- ब्राऊन शुगर - २ चमचे
- दालचिनी पावडर - १ चमचा
ॲपल पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंदाचे छोटे तुकडे करून घ्या. आता हे कढईत ठेवून मऊ होईपर्यंत चांगले शिजवा. आता ब्राऊन शुगर आणि दालचिनी पावडर घालून आणखी थोडा वेळ शिजवा. यानंतर त्यात मैदा, बेकिंग सोडा आणि कॉर्न फ्लोर घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये घालून वर कॉर्न फ्लेक्स घाला. आता हे बाऊल ओव्हनमध्ये ठेवून थोडा वेळ गरम करा. तुमचे टेस्टी ॲपल पुडिंग सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या