Homemade Anti Hair Fall Oil: मुली असो वा मुले सगळेच केस गळतीने त्रस्त असतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही दरवेळी बाजारातून महागडे प्रॉडक्ट्स विकत घेत असाल तर यावेळी हे अँटी हेअर फॉल ऑइल घरीच बनवण्याचा प्रयत्न करा. हे तेल लावल्याने हेअर ग्रोथ तर वाढेलच पण तुमचे केस सुद्धा मजबूत होतील. यामुळे केस गळती थांबेल. इतकंच नाही तर केस रेशमी आणि चमकदार देखील दिसतील. या तेलाचे इतके फायदे असतील तर एकदा घरी नक्की बनवा. चला तर मग घरी अँटी हेअर फॉल तेल कसे बनवावे ते जाणून घ्या.
- सर्वप्रथम एक ते दोन कप खोबरेल तेल घ्या.
- हे तेल एका भांड्यात शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा.
- त्यात दोन चमचे कलौंजी बिया घाला.
- सोबत मूठभर कढीपत्ता घाला.
- या तीनही गोष्टी नीट शिजवून घ्या.
- जेव्हा हे शिजायला लागेल तेव्हा त्यात सुमारे आठ ते दहा जास्वंदाचे फुले घालावीत.
- जेव्हा हे तेल शिजते आणि कमी होऊ लागते तेव्हा गॅस बंद करा आणि त्यात एलोवेरा जेल मिक्स करा.
- यात ताज्या कोरफडचा गर किंवा ताजे एलोवेरा जेल मिक्स करा.
- नीट ढवळून थोडा वेळ तसेच बाजूला ठेवा. जेणेकरून कोरफडीचे सर्व घटक या तेलात येतील.
- तेल थंड करून गाळीच्या माध्यमातून गाळून घ्या. आणि हे स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे.
घरी तयार केलेले हे अँटी हेअर फॉल ऑइल केसांना लावण्यासाठी आधी हे तेल मुळांमध्ये स्प्रे करा. साधारण दोन तास केसावर तसेच ठेवावे. त्यानंतर एखाद्या माइल्ड ऑर्गेनिक शॅम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा हे हेअर ऑईल लावा. काही महिन्यांतच केसांच्या वाढीवर आणि केस गळतीवर त्याचा परिणाम दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)