Honey and Flax Seeds Face Pack: सततच्या चुकीच्या आहारामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. अशावेळी तुम्ही दिवसभर पुरेसं पाणी प्यावं आणि ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. आहारात सुधारणा केली नाही तर अकाली वृद्धत्वाची समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर त्वचेची चांगली काळजी घेणंही गरजेचं आहे. आपण घरी देखील काही अँटी-एजिंग फेस पॅक तयार करू शकता. येथे आम्ही तुम्हाला मध आणि जवसपासून फेस पॅक कसा बनवायचा ते सांगत आहोत. हा अँटी-एजिंग फेस पॅक तुमच्या त्वचेवरील चमक देखील वाढवेल आणि मृत त्वचा काढून टाकण्यास देखील मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया हा फेस पॅक कसा बनवायचा आणि हा पॅक बनवताना वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचे फायदे.
- मध
- दही
घरी हा अँटी एजिंग फेस पॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा फ्लेक्स सीड्स बारीक करून घ्या. नंतर त्यात १-२ चमचे मध मिसळा. हे मिश्रण एक कप दह्यात मिक्स करा. सर्व काही नीट मिक्स करून घ्या. चांगले मिक्स झाल्यावर फेस पॅक तयार होतो.
तयार केलेले मिश्रण आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर सुमारे २० ते ३० मिनिटे हा मास्क चेहऱ्यावर राहू द्या. ठराविक वेळेनंतर थंड पाण्याने धुवून टाका. नंतर टॉवेलने चेहरा कोरडा करा.
दही त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि मऊ देखील बनवते. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते. त्याच वेळी, मध एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जो त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतो आणि त्वचेला चमकदार देखील बनवतो. तसेच फ्लेक्स सीड्स एक्सफोलिएशनमध्ये मदत करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)