मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Anjeer Laddu Recipe: घरीच बनवा शुगर फ्री अंजीरचे लाडू, मधुमेही रुग्णही खाऊ शकतील, जाणून घ्या फायदे!

Anjeer Laddu Recipe: घरीच बनवा शुगर फ्री अंजीरचे लाडू, मधुमेही रुग्णही खाऊ शकतील, जाणून घ्या फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 20, 2024 11:07 PM IST

Diabetes Care: मधुमेही रुग्णाची मिठाईची लालसा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अंजीर आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले लाडू त्यांना खायला देऊ शकता.

how to make Anjeer Laddu
how to make Anjeer Laddu (freepik)

Health Care: मधुमेही रुग्णांना मिठाई कशी द्यायची हा प्रश्न पडतो. मधुमेह रुग्णांना अनेकदा मिठाईचा मोह होतो. पण त्यांना साखरेमुळे मिठाई खाण्यास मनाई असते. पण त्यांची इच्छा भागवण्यासाठी तुम्ही शुगर फ्री ड्रायफ्रुट्स लाडू बनवून शकता. आज आम्ही तुम्हाला स्वादिष्ट अंजीराचे लाडू कसे बनवायचे ते सांगत आहोत. अंजीरचे लाडू खायला खूप चविष्ट असतात. हे लाडू बनवायलाही खूप सोपे असतात. हे लाडू तुमच्या शरीराला खूप ऊर्जा देतील. मधुमेहाचे रुग्णही अंजीरचे लाडू मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात. जाणून घ्या घरी अंजीर लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.

लागणारे साहित्य

अंजीर सुमारे २०० ग्रॅम

अर्धा कप बदाम

अर्धा कप काजू

अर्धा कप अक्रोड

अर्धा चमचा वेलची पूड

१/२ कप पिस्ता पेक्षा थोडा कमी

जाणून घ्या कृती

> अंजीर पाण्यात भिजवून स्वच्छ करा. आता अंजीराचे बारीक तुकडे करा.

> सर्व ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

> एका पातेल्यात २ चमचे देशी तूप घेऊन त्यात अंजीराचे तुकडे टाका.

> अंजीराचे चिरलेले तुकडे साधारण २ कप असावेत.

> अंजीर गरम आणि मऊ झाल्यावर पॅनमध्ये मॅशरच्या मदतीने मॅश करा.

> अंजीरांची पेस्ट मॅश करून तयार करा. आता त्यात चिरलेला सुका मेवा घाला.

> आता मंद आचेवर सर्व ड्रायफ्रूट्स अंजीर पेस्टमध्ये बरोबर मिसळा.

> वेलची घाला आणि लाकडी मऊसरने सर्वकाही चांगले मिसळा.

> आता एका प्लेटमध्ये तयार मसाले काढून हाताला हलके तूप लावून लाडू बनवा.

> सर्व मध्यम आकाराचे लाडू तयार करून हवाबंद बरणीत ठेवा.

> हे शुगर फ्री लाडू तुम्ही मधुमेहातही खाऊ शकता. हे लाडू १५ दिवस खराब होणार नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel