मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Anjeer Barfi Recipe: अंजीरापासून बनवा बर्फी, हिवाळ्यात मिळतील अनेक आरोग्य फायदे!

Anjeer Barfi Recipe: अंजीरापासून बनवा बर्फी, हिवाळ्यात मिळतील अनेक आरोग्य फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 16, 2024 11:04 PM IST

Anjeer barfi benefits: जाणून घ्या घरच्या घरी अंजीर बर्फी कशी बनवली जाते आणि त्याचे फायदे.

winter recipe
winter recipe (freepik)

Sweets Recipe: अंजीर हे फार प्रसिद्ध फळ नाही. पण याचे अनेक फायदे आहेत. अनेकांना याचे फायदे माहित नाही. या फळामध्ये फायबर, पॉलिफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्ससह इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. अंजीर हे हलके गोड, मऊ आणि रसाळ फळ आहे. सुकवलेले अंजीरही येते. सुके अंजीर हे ताज्या अंजिरांसारखे नसते. सुकलेले अंजीर जास्त गोड आणि टेस्टी असतात. पौष्टिक आणि चवदार, सुके अंजीर आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. अंजीरपासून तुम्ही बर्फीही बनवू शकता. अंजीर बर्फी कशी बनवायची ते आम्ही सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात रेसिपी...

लागणारे साहित्य

चिरलेली अंजीर, १ चमचा खसखस, २ चमचे चिरलेले बदाम, १ चमचे काजू, २ चमचे तूप, १/२ टीस्पून वेलची पावडर, १ कप कंडेन्स्ड मिल्क आणि नारळ साखर चवीनुसार.

जाणून घ्या रेसिपी

अंजीर दोन कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी भिजवलेल्या अंजीरातील पाणी वेगळे करून त्याचे तुकडे करून त्याची पेस्ट बनवा. सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घ्या. ते भाजल्यानंतर खसखस ​​भाजून घ्या. हे साहित्य थंड करण्यासाठी ठेवा. आता पॅनमध्ये १ चमचा तूप घालून अंजीराची पेस्ट शिजवून घ्या. हलके सोनेरी झाल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला. कंडेन्स्ड मिल्क पेस्टमध्ये शिजवल्यानंतर त्यात चवीनुसार वेलची पावडर मिसळा. आता त्यात काजू आणि बदाम पावडर मिक्स करा. थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. आता त्यावर खसखस ​​घालून झाकून ठेवा आणि १ तास सेट करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. नंतर काढून बर्फीचे तुकडे करून सर्व्ह करा.

काय फायदे मिळतात?

अंजीर हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. हे फळ पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel