Anardana Pudina Chutney Recipe: आजपर्यंत तुम्ही कैरी, कोथिंबीर, पुदिना यांसारख्या अनेक प्रकारच्या चटण्या जेवणासोबत खाल्ल्या असतील. जेवणासोबत दिल्या जाणाऱ्या चटणीमुळे भूक तर वाढतेच पण तोंडाला चवही येते. अशाच एका चटणीचे नाव आहे अनारदाना पुदिना चटणी. या चटणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चटणी खायला टेस्टी असण्यासोबतच बनवायलाही खूप सोपी आहे. एवढेच नाही तर अनारदाणा पुदीना चटणी जवळपास प्रत्येक पंजाबी कुटुंबात तयार केली जाते आणि खाल्ली जाते. तुम्हालाही या चटणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर अनारदाना पुदीना चटणी बनवण्याची ही पंजाबी पद्धत लक्षात ठेवा.
- पुदिन्याची पाने - १ कप
- हिरवा कांदा - १
- कांदा - १
- लाल/हिरवी मिरची - ५
- कोथिंबीर - मूठभर
- लाल तिखट - १ चमचा
- अनारदाना पावडर - १ चमचा
- चिंचेचे पाणी - १ चमचा
- मीठ - १ चमचा
अनारदाना पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये चिरलेला हिरवा कांदा, लाल कांदा, हिरवी आणि लाल संपूर्ण मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, मीठ, तिखट, अनारदाना पावडर आणि चिंचेचे पाणी घालून बारीक करुन घ्या. लक्षात ठेवा ही चटणी थोडी जाडसर बारीक करा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याची स्मूथ पेस्ट देखील बनवू शकता. तुमची टेस्टी पंजाबी स्टाइल अनारदाना पुदीना चटणी तयार आहे.