Tadka Tea Recipe: पावसाची मजा डबल करेल अमृतसरी तडका चहा, टेस्टी रेसिपी आहे खूप सोपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tadka Tea Recipe: पावसाची मजा डबल करेल अमृतसरी तडका चहा, टेस्टी रेसिपी आहे खूप सोपी

Tadka Tea Recipe: पावसाची मजा डबल करेल अमृतसरी तडका चहा, टेस्टी रेसिपी आहे खूप सोपी

Published Jul 03, 2024 07:42 PM IST

Monsoon Special Recipe: तुम्हीही चहाप्रेमी असाल आणि चहा पिण्याचे कोणतेही निमित्त सोडत नसाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. पावसाची मजा वाढवण्यासाठी अमृतसरी तडका चहाची ही रेसिपी ट्राय करा.

अमृतसरी तडका चहा
अमृतसरी तडका चहा (freepik)

Amritsari Tadka Tea Recipe: पावसाळा सुरू होताच सर्वप्रथम गरमा गरम चहा आणि भज्यांचा विचार मनात येतो. चांगला चहा दिवसभराचा थकवा तर दूर करतोच शिवाय पावसाची मजाही द्विगुणित करतो. रुटीन लाईफमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या चहाची चव चाखली असेल. पण तुम्ही कधी तडका चहा ट्राय केला आहे का? होय, चहाची ही खास चव पंजाबच्या अमृतसरहून आली आहे, त्याचं नाव अमृतसरी तडका टी असं आहे. जर तुम्हीही चहाप्रेमी असाल आणि दिवसाची सुरुवात करण्यापासून पावसाळ्याचा आनंद घेण्यापर्यंत चहा पिण्याचे कोणतेही निमित्त सोडत नसाल तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया अमृतसरी ताडका चहा कसा बनवायचा.

अमृतसरी तडका चहा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- १ कप दूध

- १ टेबलस्पून चहापत्ती

- २-३ वेलची बारीक केलेली

- मूठभर गुलाबाच्या पाकळ्या

- १ चमचा लोणी

- १/२ कप पाणी

- बदाम पावडर

- काजू पावडर

- काळी मिरी पावडर

अमृतसरी तडका चहा बनवण्याची पद्धत

अमृतसरी तडका चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवून त्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या घाला. यानंतर पाणी आणि दूध थोडा वेळ उकळल्यानंतर आता चहापत्ती, बारीक केलेली वेलची घालून थोडा वेळ चहा शिजवावा. यानंतर आणखी एक पॅन घेऊन त्यात चहाचा तडका तयार करा. यासाठी प्रथम लोणीचे दोन तुकडे घालून वितळवावे. यानंतर बटरमध्ये बदाम, काजू आणि काळी मिरी यांची पावडर बनवून हलकेच परतून घ्यावे. आता तडक्यामध्ये आधीच तयार केलेला चहा घाला. तुमचा टेस्टी अमृतसरी तडका चहा तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner