Alum Based Natural Cream for Dark Spots: चेहऱ्यावरील एक्ने, पिंपल्स, पिग्मेंटेशन खूप खराब दिसतात. विशेषत: तरुणींमध्ये एक्ने गेल्यानंतर चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. हे काळे डाग सहजासहजी पाठ सोडत नाही. तसेच अनेक महिलांची त्वचाही निस्तेज दिसते. चेहऱ्यावरील हे डाग तुमचा लूक खराब करतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीपासून बनवलेली ही नॅचरल क्रीम लावा. काही आठवड्यांच्या वापरानंतर, फरक आपोआप दिसेल. घरी तुरटी बेस्ड नॅचरल क्रीम कशी बनवावी हे जाणून घ्या.
नॅचरल क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे या गोष्टी -
- तुरटी
- एक लिंबाचा रस
- एक चमचा मध
- गुलाब जल
आधी तुरटीची पावडर बनवून घ्या. आता गुलाब जलमध्ये तुरटीची पावडर टाकून मिक्स करा. जेणेकरून ते चांगले विरघळते. त्यासोबत एक चमचा लिंबाचा रस घाला. एक चमचा मध घेऊन सर्व साहित्य मिसळून पेस्ट तयार करा. तुम्ही ही पेस्ट फ्रिजमध्ये सहा ते सात दिवस साठवू शकता.
चेहरा नीट धुतल्यानंतर हे क्रीम लावा. साधारण अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे क्रीम सहज लावता येते. यामुळे त्वचा स्वच्छ होण्याबरोबरच डाग दूर होण्यास आणि फाइन लाइन कमी होण्यास मदत होईल.
तुरटी नैसर्गिकरित्या त्वचा पांढरी करण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचेच्या डागांचा रंग हलका होतो. तसेच त्वचेवर चमक दिसू लागते. याव्यतिरिक्त, तुरटी मोठ्या छिद्रांना लहान करते. ज्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया थांबते. इतकंच नाही तर त्वचा तरुण दिसते. मध त्वचेला मॉइश्चरायझ करतो. त्यामुळे तुरटीपासून बनवलेली ही नैसर्गिक क्रीम अनेक आठवडे लावल्यास त्वचेला चमक येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या