Milk Recipe: हे दूध नाश्त्यासाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Milk Recipe: हे दूध नाश्त्यासाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या घरी बनवण्याची सोपी पद्धत

Milk Recipe: हे दूध नाश्त्यासाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या घरी बनवण्याची सोपी पद्धत

Feb 28, 2024 05:49 PM IST

Healthy Eating: हे दूध प्यायल्याने दिवसभर पोट भरलेले राहते. याशिवाय हाडांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया हे दूध बनवण्याची खास रेसिपी.

Milk Benefits
Milk Benefits (Freepik)

How to make almond milk at home: नाश्त्यासाठी किती आरोग्यदायी पदार्थ खाणे गरजेचे आहे. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. हेल्दी नाश्त्यामुळे पोट भरलेले राहते आणि तुमची उत्पादकता वाढते. याशिवाय नाश्ता केल्याने तुमच्या मेंदूला सकाळी एक उत्तम सुरुवात मिळते. यामुळे तुम्हाला दिवसभर चांगले वाटते. इतकंच नाही तर तुमच्या शरीराला ताकद देण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यातही हे उपयुक्त आहे. हे सर्व मिळवण्यासाठी तुम्ही नाश्त्यात बदामाचे दूध प्यायाला हवे. आता हे दूध कसे बनवायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर चला जाणून घेऊया हे दूध बनवण्याची रेसिपी.

बदामाचे दूध बनवण्याची रेसिपी

बदामाचे दूध बनवण्यासाठी प्रथम बदाम रात्रभर भिजत ठेवा. नंतर ते सोलून सकाळी बारीक करा. नंतर त्यात १ ग्लास दूध घाला आणि सर्वकाही छान मिक्सरमध्ये मिक्स करून घ्या. तुमचं बदामाचं दूध तयार आहे. जर तुम्हाला ते गरम करून प्यायचे असेल तरी तुम्ही ते आरामात पिऊ शकता.

Dinner Recipe: जेवणासाठी बनवा शेवग्याच्या शेंगांची स्वादिष्ट भाजी, जाणून घ्या रेसिपी!

काय आहेत फायदे?

तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये असेल असाल तर तुमच्यासाठी हे बदामाचे दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुम्हाला स्टॅमिना हवा असेल तर तुम्ही बदामाचे दूध पिऊ शकता. हे दूध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हाडांची ताकद वाढवण्यासाठीसुद्धा हे मदत करते. याशिवाय हे दूध प्यायल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि मेंदू वेगाने काम करतो.

Beet Juice: बीटरूट केसांचा सुधारू शकतो रंग, कसा करायचा वापर जाणून घेऊयात!

त्यामुळे, तुम्ही सकाळी नाश्त्यात हे बदामाचे दूध आवर्जून पिऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे हे दूध घरीच बनवा आणि मग सेवन करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner