Homemade Facial Scrub: बदाम आणि मुलतानी मातीपासून बनवा स्क्रब, मिळेल चमकदार त्वचा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Homemade Facial Scrub: बदाम आणि मुलतानी मातीपासून बनवा स्क्रब, मिळेल चमकदार त्वचा!

Homemade Facial Scrub: बदाम आणि मुलतानी मातीपासून बनवा स्क्रब, मिळेल चमकदार त्वचा!

Mar 12, 2024 10:52 AM IST

Skin Care Tips: मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी फेस स्क्रब करणे गरजेचे आहे.

how to Make a scrub from almonds and multani mud
how to Make a scrub from almonds and multani mud (Freepik)

Glowing Skin Care Tips: स्किन केअर आजचा फार महत्त्वाचा भाग झाला आहे. पल्या रोजच्या दिनचर्येत अनेक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश करून स्किन केअर केलं जातं. पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की केमकलयुक्त उत्पादनांपेक्षा नेहमी नॅचरल उत्पादने फार उपयुक्त ठरतात. नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. साधारणपणे, आपल्या त्वचेचे लाड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती फेस मास्क वापरले जातात. पण केवळ फेस मास्क वापरणे पुरेसे नाही. आपण वेळोवेळी त्वचा देखील स्क्रब करणे आवश्यक आहे.

स्क्रब केल्याने स्किन एक्सफोलिएट होते. एक्सफोलिएशन केवळ मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करत नाही तर त्वचेला डीप क्लीन करते. जेव्हा वेळोवेळी त्वचेला एक्सफोलिएट करता तेव्हा त्वचा चमकदार होते. जर तुम्ही घरी तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्याचा विचार करत असाल तर बदाम आणि मुलतानी माती उत्तम ठरेल. यापासून तुम्ही फेस स्क्रब तयार करू शकता. बदामामध्ये फॅटी ॲसिड भरपूर असते, तर मुलतानी माती त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया मुलतानी माती आणि बदामाचा स्क्रब कसा बनवायचा ते...

१ टेबलस्पून ग्राउंड बदाम

गरजेनुसार गुलाबपाणी

बदाम तेलाचे काही थेंब

Glowing Face Home Remedies: या सोप्या फॉर्मुलाचा करा अवलंब, येईल चेहऱ्यावर चमक!

जाणून घ्या कसं बनवायचं स्क्रब?

> सर्वप्रथम बदाम बारीक करून त्याची पावडर बनवा.

> आता एका भांड्यात बदाम तेल, मुलतानी माती आणि बदाम पावडर एकत्र मिक्स करा.

> गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी हळूहळू गुलाब पाणी घाला.

> आता तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि त्वचेवर लावा आणि वर्तुळाकार हालचालीत हलके मसाज करा.

> शेवटी, कोमट पाण्याने त्वचा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

Winter Skin Care: चेहऱ्यावर दररोज मॉइश्चरायझर लावल्यास काय होते? जाणून घ्या

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner