मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relationship Tips: आपला जोडीदार सपोर्टिव्ह आहे की नाही कसं ओळखायचं? जाणून घ्या टिप्स!

Relationship Tips: आपला जोडीदार सपोर्टिव्ह आहे की नाही कसं ओळखायचं? जाणून घ्या टिप्स!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 04, 2024 12:09 AM IST

फक्त स्वतःच विचार करण्यापासून ते फक्त त्यांच्याच विजयाचा आनंद साजरा करण्यापर्यंत, अशी काही लक्षणं आहेत ज्यामुळे समजते की आपला जोडीदार सपोर्टिव्ह आहे की नाही ते..

signs that you are not being a supportive spouse
signs that you are not being a supportive spouse (Unsplash)

निरोगी नातेसंबंधासाठी जोडीदाराकडून समान प्रमाणात प्रयत्न, समर्पण, विश्वास, निष्ठा आणि समर्थनाची आवश्यकता असते. एकमेकांना आधार देणे, एकमेकांच्या अपूर्णतेचा स्वीकार करणे हे महत्त्वाचे. कधी कधी आपल्या जोडीदाराकडे बघून असे वाटू शकते की ती किंवा तो आपल्याला स्पोर्ट करत नाहीये. नातं टिकवून ठेवण्यासाठी आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला किती सपोर्ट करत आहात? ते आपल्याला समर्थन देण्यास तयार आहात का? याबद्दल लक्षात घेणे गरजेचे आहे. आपला पार्टनर सपोर्टिव्ह आहे की नाही याबद्दल जाणून कसं घ्यायचं याबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट कपल्स कोच ज्युलिया वुड्स यांनी लिहिली आहे. चला जाणून घेऊयात आपला जोडीदार सपोर्टिव्ह आहे की नाही कसं ओळखायचं ते…

चांगला श्रोता होणे

जेव्हा जोडीदार अस्वस्थ किंवा रागावतो, तेव्हा आपण एक चांगला श्रोता बनला पाहिजे. विशिष्ट मार्गाने त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि त्यांच्या भावना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या कठीण भावनांना समजून न घेणे हे नात्यासाठी फार वाईट आहे.

वचनांचे पालन न करणे

आश्वासने देणे आणि त्यांचे पालन न केल्याने निराशा आणि नाराजी होऊ शकते. आपण आपल्या क्षमतेनुसार आश्वासने दिली पाहिजेत. अशा प्रकारे, आपण आपल्या शब्दांशी कृतींशी जुळवून घेऊ शकतो आणि अधिक विश्वास आणि जवळीक विकसित करू शकतो.

विजयाचा आनंद साजरा न करणे

जोडीदार हा सर्वात मोठा चीअरलीडर असणे गरजेचे आहे. यासोबत चांगल्या आणि वाईट काळात त्यांच्यासोबत असणे. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करणे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केल्याने त्यांचे मनोबल वाढण्यास आणि त्यांना अधिक आत्मविश्वास देण्यास मदत होते.

अवघड संभाषण टाळणे 

आपण कठीण संभाषणातून बसून समस्येविरुद्ध एक टीम म्हणून एकत्र काम केले पाहिजे. त्यांच्याकडे शत्रू म्हणून पाहण्यापेक्षा आपण एकत्र येऊन तोडगा काढायला हवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel