World Introvert Day 2024: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सवयी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Introvert Day 2024: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सवयी!

World Introvert Day 2024: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सवयी!

Jan 02, 2024 10:07 AM IST

Introvert Personality: दरवर्षी २ जानेवारी हा दिवस जागतिक अंतर्मुख दिन म्हणजेच जागतिक इन्ट्रोव्हर्ट दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. पण आपण इन्ट्रोव्हर्ट आहोत की नाही हे कसं ओळखायचं ते जाणून घेऊयात.

How to know if you are an introvert or not
How to know if you are an introvert or not (freepik)

How to Recognize Introvert Personality: आजचा अर्थात २ जानेवारीचा दिवस इन्ट्रोव्हर्ट स्वभावाच्या (World Introvert Day 2024) लोकांना समर्पित आहे. या दिवसाचा उद्देश इतर लोकांना इन्ट्रोव्हर्ट असणाऱ्या लोंकाच्या जगाची ओळख करून देणे हा आहे. आजूबाजूला विविध प्रकारचे लोक असतात , त्यापैकी काही लोक आहेत ज्यांना बाहेर फिरायला, रोज नवीन मित्र बनवायला आणि नवीन लोकांशी बोलायला आवडते. तर या सगळ्याच्या अगदी उलट काही लोक अंतर्मुखी म्हणजेच इन्ट्रोव्हर्ट असतात जे नेहमी गप्प राहतात आणि कमी बोलतात. इन्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्व असलेले लोक असामाजिक आणि लाजाळू असतात ज्यांना इतर लोकांशी जास्त संवाद साधणे आवडत नाही. अशा व्यक्तींना फक्त स्वतःसोबतच वेळ घालवायला आवडते. पण आपल्यापैकी अनेकांना आपण इन्ट्रोव्हर्ट आहोत की नाही याबद्दल माहीतच नसतं. तुम्ही इन्ट्रोव्हर्ट कॅटेगरीत येता का ते जाणून घ्या.

या सवयीने ओळखा

> इन्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे आवडत नाही. ते फॅमिली फंक्शन, सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे कारण शोधू लागतात.

> इन्ट्रोव्हर्ट असलेले लोक अनेक लोकांशी मैत्री करत नाहीत. त्यांच्याशी इतर लोकांवर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी खूप कठीण असते.

> इन्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्व असलेल्या लोकांची खास गोष्ट म्हणजे त्यांची लाइफस्टाइल संतुलित ठेवतात.

> एक्सोव्हर्ट लोक पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी आणि नवीन लोकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक असतात, तर इन्ट्रोव्हर्ट लोकांना नवीन लोकांशी बोलण्यात खूप अस्वस्थ वाटते आणि हे काम त्यांच्यासाठी खूप कठीण असते.

> इन्ट्रोव्हर्ट असलेले बहुतेक लोक कधीकधी त्यांच्या सामाजिक संवादाच्या अभावामुळे गर्विष्ठ मानले जातात.

> इन्ट्रोव्हर्ट असलेले लोक त्यांच्या आवडी-निवडीबद्दल अगदी अचूक असतात. असे लोक आपले मत फार लवकर तयार करत नाहीत किंवा कोणाच्या सल्ल्याने बदलत नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner