Home cooling trick for summer: राज्यातील गरमी भीषण उष्णता शिगेला पोहोचली आहे. अजून मे महिनाही आला नाही तोवरच उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळी आर्द्रता आणि उष्मा एवढा वाढतो की, यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक घरात कूलर आणि एसी चालवतात. पण सगळ्यांकडेच एसी नसतो. मग अशावेळी ज्यांच्या घरात एसी नाही अशा लोकांनी काय करावे? अशा गरमीच्या वातावरणात घरात एसी नसेल तर घरात राहणे एखाद्या शिक्षेपेक्षा कमी वाटत नाही. तुमच्या घरात एसी नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला एसी कूलरशिवाय तुमचे घर कसे थंड ठेवायचे आहे ते सांगणार आहोत.
वाढलेला उष्माघात टाळण्यासाठी, घरात आणि बाहेर उपयोगी रोपं लावा. अश्या वनस्पती त्यांच्या सभोवतालची थंड हवा सोडतात, त्यामुळे वातावरण नेहमी थंड राहते. उष्णतेपासून आराम मिळवण्याचा हा एक नैसर्गिक आणि बेस्ट मार्ग आहे.
खिडक्या कोणत्याही घरात किंवा खोलीत सर्वाधिक उष्णता पसरवतात. अशा परिस्थितीत, कडक सूर्यप्रकाश खिडकीतून थेट घरात येत नाही, म्हणून आपण आपल्या घराच्या खिडक्यांना जाड पडदे लावावे. यामुळे तुमच्या घरातील हवा थंड राहते आणि उष्णतेपासून आराम मिळतो.
एसी नसेल तर तुमच्या घरात कूलर असेल तर त्याच्या टाकीत थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे टाका. यामुळे तुमचा कूलर थंड हवा बाहेर टाकेल. पाणी घातल्यानंतर काही मिनिटांतच कूलरमधून थंड हवा येऊ लागते.
घरात एक्झॉस्ट फॅन लावा. हा फॅन घराच्या आतील गरम हवा बाहेर फेकून देतो आणि घर थंड ठेवतो. त्यामुळे उन्हाळ्यात हा पंखा नेहमी चालू ठेवावा. जेणेकरून हवेबरोबर उष्णता सहज निघून जाईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या