मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Self-confidence: स्वत:ला कोणापेक्षा कमी समजू नका, या ५ टिप्सने वाढवा आत्मविश्वास!

Self-confidence: स्वत:ला कोणापेक्षा कमी समजू नका, या ५ टिप्सने वाढवा आत्मविश्वास!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 08, 2024 02:00 PM IST

Personality Development: जीवनात यश मिळवण्यासाठी आणि आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो.

how to increase self confidence
how to increase self confidence (freepik)

How Develop Self Confidence: आयुष्यात यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. पण आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची असते. ही एक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. हे खूप महत्त्वाचे आहे. पण बरेच लोक समोरच्याशी किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये बोलू शकत नाही. अनेकदा तर ते कोणतेही काम करताना ते कचरतात. त्यामुळे त्यांना कोणतेही काम नीट करता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही. त्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रेझेंटेशन देताना खूप अडचणी येतात, पण याउलट आत्मविश्वास असलेल्या लोकांसाठी हे काम अगदी सोपे होते. यासाठीच आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घ्या.

लहान पावले उचला

ज्या ठिकाणी पोहचायचं आहे त्या ठिकाणी किंवा त्या कामासाठी डिरेक्ट जाऊ नकात. छोट्या छोट्या टार्गेटसह यश मिळवा. याच उदाहरण द्यायचं म्हणजे स्टेजवर जाऊन भाषण करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बसून त्याबद्दल बोलू शकता. अशाप्रकारे तुम्ही कोणतीही भीती न बाळगता सतत सराव करत राहता.

Personality Development: या सवयी तुमच्या व्यक्तिमत्त्वात आवर्जून करा समाविष्ट, सगळ्यांकडून मिळेल आदर!

स्वतःवर विश्वास ठेवा

आयुष्यात काहीही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपण आपले विचार प्रभावीपणे इतरांसमोर उघडपणे मांडू आणि समजावून घेऊ शकता.

अतिविचार करणे

आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही गोष्टींचा अतिविचार करण्याची सवय आताच सोडा. निरर्थक गोष्टींबद्दल विचार करण्यात तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सकारात्मक सेल्फ-चर्चा करा.

Personality Development: हे शब्द, वाक्य वारंवार वापरतात त्यांचा आत्मविश्वास असतो कमी, तुम्ही वापरता का?

स्वतःची इतरांशी तुलना करू नका

दुसऱ्याच्या लाइफस्टाइलशी आणि विचारांची तुमच्याशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel