मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  How to increase platelet: डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाली आहे? मग 'हे' पदार्थ नक्की खा

How to increase platelet: डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाली आहे? मग 'हे' पदार्थ नक्की खा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 13, 2024 05:13 PM IST

How to increase platelet: डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण कसे वाढवावे असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमुळे प्लेटलेट्स वाढतात...

dengue platelet: प्लेटलेटची संख्या वाढवणारे पदार्थ
dengue platelet: प्लेटलेटची संख्या वाढवणारे पदार्थ

पावसाळा सुरु झाला की साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती सुरु होते. हे डास चावल्याने माणसांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये डेंग्यूच्या डासांचे प्रमाण सर्वाधिक असते. डेंग्यू झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. त्या कमी झाल्यावर वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत...

पावसाळ्यात डासांमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. हा एक गंभीर आजार आहे. हा आजार झाल्यावर सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. भारतातच दरवर्षी डेंग्यूच्यी रुग्णांची संख्या सर्वाधिक नोंदवली जाते.अशात या आजारापासून स्वत:चा बचाव करणे महत्त्वाचे आहे आणि जर कोणाला हा आजार झाला असेल तर योग्य माहिती घेऊन वेळीच योग्य उपचार करा. डेंग्यूमुळे रुग्णाच्या प्लेटलेटचे प्रमाण अनेकदा कमी होते. अशा परिस्थितीत आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते चला जाणून घेऊया...
वाचा: दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गुलाबी ड्रिंकने करा सुरुवात, वाचा रेसिपी

डेंग्यू झालेल्या रुग्णांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेटची गरज असते. यामध्ये कोणते पदार्थ येतात चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

व्हिटॅमिन बी ९ हे मसूर, बीन्स, अॅवोकॅडो आणि इतर धान्यामध्ये सर्वाधिक असते. त्यामुळे रुग्णांनी हे पदार्थ नक्की खावेत. प्लेटलेट्सच्या सुरळीत कार्यासाठी, व्हिटॅमिन केने समृद्ध आहार घ्यावा. त्यामध्ये फळे, पालक, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य, शतावरी या पदार्थांचा समावेश होतो. तसेच संत्री, लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सिमला मिरची यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात.
वाचा: फ्रेंच फ्राईज, बटाटा वडा रोज खाताय? जाणून घ्या शरीरावर काय होत परिणाम

पपईचे पान प्लेटलेट कमी झाल्यावर खाण्याचा सल्ला देतात. त्यामध्ये फायटो केमिकल असते. जे प्लेटलेट वाढवण्यास मदत करते.

आवळा खाल्याने देखील पांढऱ्या रक्त पेशी वाढतात. ज्या प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतात. तसेच त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात.
वाचा: घरी पाळीव श्वान आणताय? मग 'या' पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा

डेंग्यू झालेल्या रुग्णांना दही खाण्यास देतात. हे खाल्ल्याने बोन मॅरोची प्लेटलेट निर्मिती क्षमता वाढते. तसेच डाळिंब खाल्ल्याने शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स आणि लोह मिळते. त्यामुळे प्लेटलेट्स वाढतात.

बीटरुटमध्ये आरोग्यास गुणकारी गूणधर्म असतात. ते खाल्ल्यामुळे प्लेटलेट्स वाढतात. तसेच किवी या फळामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात. हे फळ देखील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते.

भिजवलेले मनुके हे कमी झालेले प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. यामध्ये असलेले आयर्न प्लेटलेट काउंट वाढवते.

WhatsApp channel
विभाग