How To Identify Real Kesar: केशर प्रत्येक घरात वापरले जाते. केशर स्वयंपाकघरातील सर्वात महागड्या वस्तूंपैकी एक आहे. अतिशय महागडं असलं तरी, प्रत्येक घरात सण-समारंभाची मिठाई किंवा गोड पदार्थ तयार करतान केशर हे वापरलेच जाते. मिठाईचा रंग आणि चव वाढवण्यासाठी केशराचा वापर केला जातो. केशर हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. काश्मीरच्या खोऱ्यात पिकणारं हे मौल्यवान केशर देशभरातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणात विकले जाते. मात्र, इतर अनेक गोष्टींप्रमाणे केशरमध्ये देखील भेसळ होते. अशावेळी केशराची शुद्धता तपासून पाहणे गरजेचे आहे. तुम्ही वापरत असलेले केशर खरे आहे की नाही ते कसे ओळखायचे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या टिप्स नक्की ट्राय करा.
केशर असली आहे की नकली, हे तपासण्यासाठी ते पाण्यात टाकून पाहा. यासाठी एका काचेच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात केशराची एक काडी टाका. जर, केशराची काडी पाण्यात टाकताच रंग सोडू लागली तर, समजून की हे केशर खोटे आहे. खऱ्या केशराचा रंग पाण्यात उतरण्यासाठी थोडा वेळ लागतो, हे लक्षात ठेवा.
केशर खरे आहे की खोटे हे ओळखण्यासाठी, ते चाखून देखील पाहा. यासाठी जिभेवर केशराचा एक तंतू ठेवा. जर केशर खरे असेल, तर तुम्हाला १५ ते २० मिनिटांत उष्णता जाणवू लागेल. मात्र, नकली केशर खाल्ल्याने असे होणार नाही. दुसरीकडे, जिभेवर केशर ठेवल्यानंतर लगेच रंग सुटू लागला किंवा गोड चव येऊ लागली, तर ते खोटे आहे हे समजून जा.
केशर देखील दाबून तपासले जाऊ शकते. खरा आणि खोटा केशर ओळखण्यासाठी त्याचे तंतू हातात घेऊन दाबून बघा. जर तो तंतू लगेच तुटला, तर ते केशर खरे आहे. खरे आणि शुद्ध केशर मऊ असते, म्हणून ते हातात धरताच तुटते.
गरम दुधात केशर टाकून त्याची शुद्धता तपासता येतो. यासाठी कोमट दुधात केशर टाका, जर ते दुधात पूर्णपणे विरघळले तर ते खरे केशर आहे. तर, नकली केशर दुधात विरघळणार नाही आणि त्याचे तंतू दुधात तसेच राहतात.