Tips to Identify Purity of Milk: सकाळी गरम चहाच्या कपापासून ते दुपारच्या जेवणात दिल्या जाणाऱ्या गोड पदार्थापर्यंत, स्वयंपाकाची अनेक कामे आहेत जी दुधाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊन हाडे मजबूत राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही तुम्हाला माहीत आहे का की या दुधात भेसळी असेल तर ते आरोग्याला फायद्याऐवजी नुकसानच करू लागते. भेसळ टाळण्यासाठी महिला अनेकदा बाजारातून पॅकेटचे दूध खरेदी करतात. पण पॅकेटच्या दुधातही भेसळ असू शकते हे अनेकांना माहीत नसते. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, आपण घरीच दुधातील भेसळ तपासू शकता.
जर तुमच्या दुधात स्टार्चची भेसळ झाली असेल तर ते सहज शोधता येते. यासाठी ५ मिली दुधात दोन चमचे मीठ किंवा आयोडीन मिक्स करा. दुधाचा रंग निळा झाला तर समजून घ्या की दुधात स्टार्चची भेसळ झाली आहे.
बहुतेक पॅकेटच्या दुधात फॉर्मेलिनचा वापर जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. दुधात फॉर्मेलिनची भेसळ तपासण्यासाठी टेस्ट ट्यूबमध्ये १० मिली दूध घ्या आणि त्यात सल्फ्यूरिक अॅसिडचे २-३ थेंब टाका. काही वेळाने दुधावर निळी रिंग तयार झाली तर याचा अर्थ दुधात फॉर्मेलिनची भेसळ झाली आहे.
दुधात भेसळ तपासण्यासाठी प्रथम दुधाचा वास घ्या. दुधाला साबणासारखा वास येत असेल तर सावध रहा. हे सिंथेटिक दूध असू शकते.
वनस्पती तूप किंवा डालडा हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. दुधात भेसळ तपासण्यासाठी २ चमचे हायड्रोक्लोरिक अॅसिड, १ चमचा साखर आणि एक चमचा दूध घालून चांगले मिक्स करा. दुधाचा रंग लाल झाला तर समजून घ्या की दूध अशुद्ध आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या