Skin Tanning: उन्हाळ्यात काळी झालेली त्वचा गोरी करण्यासाठी मदत करेल हे DIY बॉडी लोशन, पाहा कसे बनवावे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Tanning: उन्हाळ्यात काळी झालेली त्वचा गोरी करण्यासाठी मदत करेल हे DIY बॉडी लोशन, पाहा कसे बनवावे

Skin Tanning: उन्हाळ्यात काळी झालेली त्वचा गोरी करण्यासाठी मदत करेल हे DIY बॉडी लोशन, पाहा कसे बनवावे

Published Apr 07, 2024 02:28 PM IST

DIY Body Lotion: चेहऱ्यावरील सन टॅनिंग आणि काळेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचा गोरी करण्यासाठी हे होममेड बॉडी लोशन लावा. हे घरी कसे बनवायचे ते जाणून घ्या.

Skin Tanning: उन्हाळ्यात काळी झालेली त्वचा गोरी करण्यासाठी मदत करेल हे DIY बॉडी लोशन, पाहा कसे बनवावे
Skin Tanning: उन्हाळ्यात काळी झालेली त्वचा गोरी करण्यासाठी मदत करेल हे DIY बॉडी लोशन, पाहा कसे बनवावे

Homemade Body Lotion for Skin Tanning: उन्हाळ्यात कडक उन्हाबरोबरच धूळ, माती आणि प्रदूषण त्वचेवर जमा होऊ लागतात. चेहऱ्यासोबतच हात-पायांची त्वचाही काळी पडू लागते. खरं तर त्वचेचा नैसर्गिक रंग मृत त्वचेखाली लपलेला असतो. अशा परिस्थितीत डेड स्किन काढण्यासाठी त्वचेवर वारंवार एक्सफोलिएट करूनही कोणताही परिणाम दिसून येत नाही. त्वचेवर काळेपणा जास्त दिसत असेल तर हे बॉडी लोशन घरीच बनवा आणि लावा. हे नियमित लावल्याने काही दिवसातच फरक दिसून येईल. जाणून घ्या हे होममेड बॉडी लोशन कसे बनवायचे आणि लावायचे. 

कसे बनवायचे होममेड बॉडी लोशन

होममेड बॉडी लोशन बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- दहा चमचे एलोवेरा जेल

- दहा चमचे ज्येष्ठमधचा अर्क

- १० व्हिटॅमिन ई कॅप्सूल

- २० व्हिटॅमिन सीच्या गोळ्या

त्वचेचा काळेपणा दूर करणारे बॉडी लोशन कसे बनवावे

हे बॉडी लोशन बनवण्यासाठी सर्वप्रथम एका काचेच्या भांड्यात दहा चमचे एलोवेरा जेल घ्या. नंतर त्यात दहा चमचे ज्येष्ठमध अर्क घ्या. ज्येष्ठमध अर्क काढण्यासाठी ज्येष्ठमधची काडी एक ग्लास पाण्यात उकळवा. हे पाणी उकळून अर्धे करा. नंतर गाळून घ्या. हे उरलेले पाणी एलोवेरा जेलमध्ये मिक्स करा. तसेच व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या दहा कॅप्सूल घ्या. जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई तेल असेल तर ते देखील वापरता येते. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्या. ही गोळी पावडरमध्ये चांगली बारीक करा आणि या मिश्रणात मिक्स करा. हे सर्व नीट मिक्स करून घ्या.

होममेड बॉडी लोशन लावण्याची योग्य पद्धत

हे लोशन हात, पाय आणि चेहऱ्यावर दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा लावा. तसेच सनस्क्रीन लावा. त्वचेवरील काळेपणा सोबतच त्वचेचे डाग आणि ढिलेपणा देखील दूर करेल. तसेच त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner