Health Care: पोटात आम्लपित्त होणे सामान्य आहे. अनेकदा बाहेरचे खाणे किंवा तिखट-मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात ॲसिडिटीची समस्या निर्माण होते. अधूनमधून ॲसिडिटी होत असेल तर काही हरकत नाही. हे फार सामान्य आहे. पण नेहमी काहीही खाल्ल्यानंतर ॲसिडिटी किंवा पोटात तीव्र गॅस होत असेल तर तुम्ही ते हलके न घेता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण पुन्हा पुन्हा ॲसिडिटी होणे हे गंभीर समस्येचे लक्षण आहे. पोटात निर्माण होणाऱ्या तीव्र आम्लपित्तला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग म्हणतात. यात छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, छातीत दुखणे, घशात काहीतरी अडकल्याची भावना आणि वारंवार पोटात पेटके येणे यांचा समावेश होतो.
आपण ज्या प्रकारच लाइफस्टाइल फॉलो करत आहोत, ज्यामध्ये आपल्या जेवणाची कोणतीही निश्चित वेळ नसते. आपण अनेकदा आपल्याला वाटेल तेव्हा खातो आणि बाहेरचे अन्न जास्त खातो. स्ट्रीट फूड किंवा मसालेदार पदार्थ चवीला छान लागतात पण त्यामुळे ॲसिडिटी होते. यावर आपण घरगुती उपाय करू शकता.
> आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा.
> जेवणानंतर बडीशेप खा. बडीशेप तुम्ही गुळासोबतही खाऊ शकता.
> पोट फुगणे आणि गॅसच्या समस्येवर जिऱ्याचे पाणी उपयुक्त ठरेल.
> दह्याचे सेवन ॲसिडिटीवर रामबाण औषधासारखे काम करते. त्यामुळे आहारात दह्याचा समावेश करा.
> जेवणानंतर केळी खा. कारण केळ्यामध्ये पोटॅशियम असते जे अॅसिड शांत करते.
> ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा प्रभावी आहे. तुम्ही कोमट पाण्यासोबत ओवा घेऊ शकता.
> गॅसच्या समस्येपासून आराम देण्यासाठी हिंग गुणकारी आहे. कोमट पाण्याबरोबर चिमूटभर हिंग घ्या.
> आल्याचे तुकडे पाण्यात उकळा आणि नंतर गाळून प्या.
> जेवण झाल्यावर आवर्जून ताक प्या. ताक खाल्ल्याने पोटातील अॅसिडिटी दूर होते.
> दुधात काळी मिरी मिसळून प्यायल्यानेही ॲसिडिटीपासून आराम मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या