Effective Remedies to Remove Lice from Hair: उवा हा एक प्रकारचा कीटक आहे जो एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला आपले घर बनवतो. ते केसांच्या मुळाशी राहून केवळ रक्त पित नाही तर डोकेदुखी, खाज सुटणे आणि त्वचेचा संसर्ग यासारख्या समस्याही निर्माण करतात. कधी कधी यामुळे लाजिरवाणे देखील वाटू शकते. त्यांची संख्या झपाट्याने वाढते, त्यामुळे ते सहजपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीला उवांची समस्या असेल तर त्यांच्यापासून अंतर ठेवा. जर एखादी व्यक्ती वारंवार डोकं खाजवत असेल तर त्याच्या डोक्यात उवा असू शकतात हे समजून घ्यावे आणि सावधगिरी बाळगावी. याचे कारण जाणून घ्या.
- उवा असलेल्या व्यक्तीचे कपडे वापरल्याने किंवा पलंग शेअर करूनही तुम्ही त्याचे शिकार होऊ शकता.
- उवांचा त्रास असलेल्या व्यक्तीसोबत टोपी, टॉवेल किंवा कंगवा शेअर केल्याने तुमच्या डोक्यात उवा येऊ शकतात.
कडुनिंबाचे तेल खूप प्रभावी आहे. कारण ते खूप कडू असते जेणेकरून केसांमध्ये उवा जास्त काळ टिकत नाहीत. यासाठी रात्री कडुनिंबाच्या तेल लावून झोपा आणि सकाळी हलक्या कोमट पाण्याने केस धुवा.
ओठ आणि त्वचेचे कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर केला जातो. परंतु हे केसांमध्ये लावल्याने उवांपासून आराम मिळतो.
उवा दूर करण्याचा हा देखील एक प्रभावी मार्ग आहे. लिंबाच्या रसात चिरलेला लसूण आणि बदाम मिसळा. हे केसांना लावून एक तास ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा.
अॅपल साइडर व्हिनेगर देखील केसांमध्ये वापरला जाऊ शकतो. या उपायाने उवा दूर होतील.
ऑलिव्ह ऑईलमुळे उवांचा जीव गुदमरतो आणि ते मरतात. हा उपाय करून उवा परत येत नाहीत.
टी ट्री ऑइलमध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. ज्यामुळे उवा दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग मानला जातो.
कांद्याचा रस काढून केसांना लावून सुमारे ३ ते ४ तास ठेवावा. यानंतर उवा कंगवा करून काढून घ्या. शॅम्पूने केस धुवून घ्यावेत. उवा बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
कंडिशनरमध्ये बेकिंग सोडा मिसळल्यास उवा ही नष्ट होतात. यासाठी तीन तृतीयांश कंडिशनर आणि एक तृतीयांश बेकिंग सोडा घेऊन केसांना लावावा. आता उवा कंगव्याने काढा आणि शॅम्पूने केस धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)