पावसाळ्यात केसांशी संबंधीत समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. पावसात भिजल्यानंतर केसांच्या टाळूला एक विचित्र वास येऊ लागतो. हा वास घालवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो जात नाही. पावसात केस भिजवल्यानंतर येणाऱ्या दुर्गंधीने तुम्हीही त्रस्त असाल तर आज आम्ही तुमच्या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. येथे काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे केस निरोगी होतील तसेच त्यातून येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येपासून सुटका होईल.
पावसाळ्यात केसांमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी दही आणि दालचिनी अतिशय प्रभावी आहेत. ही आणि दालचिनी एकत्र करून बनवलेला मास्क लावल्याने केसांचा चिकटपणा दूर होईल आणि टाळूतून येणारी दुर्गंधीही दूर होईल. दही आणि दालचिनीचा मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक छोटी वाटी भरून दही घ्या आणि त्यात एक चमचा दालचिनी पावडर घाला. हे दोन्ही चांगले मिक्स करा. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा. केस कोरडे झाल्यावर धुवून टाका.
वाचा: स्वयंपाकघरातील वस्तू पावसाळ्यात कशा सांभाळाव्यात? 'या' टिप्स येतील तुमच्या कामी!
लिंबाचा रस केसांशी संबंधीत अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरला जातो. लिंबाचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे केसांची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. केसांमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी एक कप कोमट पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस टाका. आता हे पाणी आपल्या टाळूवर चांगले लावा. काही वेळाने माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून घ्या. आठवड्यातून एकदा तरी असे केल्याने केसांमधून येणारा वास दूर होतो.
वाचा: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा
पावसाळ्यात केसांमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगरचाही वापर केला जाऊ शकतो. सफरचंद साइडर व्हिनेगर टाळूवरील ओलाव्यामुळे वाढणारे बॅक्टेरिया काढून टाकते आणि केसांची दुर्गंधी दूर करते. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. केसांचा वास दूर करण्यासाठी दोन कप पाण्यात सफरचंदव्हिनेगर मिसळून केस चांगले धुवून घ्यावेत.
वाचा: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा
पावसाळ्यात केसांची समस्या सर्वात जास्त असते, थोड्याशा निष्काळजीपणामुळे केसांना फाटे फुटतात, केसांना विचित्र वास येऊ लागतो. त्यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्यात केस तुटू नयेत आणि केसांना दुर्गंधी येऊ नये यासाठी तुम्ही तुमचे केस नेहमी कोरडे ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. धुतल्यानंतर केस कोरडे करा.
संबंधित बातम्या