
Tips to Get Natural Glow: प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यावर चमक हवी असते. परंतु बहुतेक लोक रासायनिक क्रीम, फेस पॅक आणि भरपूर मेकअप लावतात. जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवायची असेल, तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या तीन गोष्टींचा समावेश करा. यामुळे चेहरा दीर्घकाळ उजळण्यास तसेच डाग, सुरकुत्या आणि मुरुम दूर करण्यात मदत होईल. उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. काही गोष्टींचे पालन केले तर ग्लोइंग स्किन मिळते. चला तर मग जाणून अशा कोणत्या तीन गोष्टी आहे ज्यांचा डेली रुटीनमध्ये समावेश केला पाहिजे.
कोणत्याही प्रकारे सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुम्ही घराबाहेर जात नसाल तरीही चेहऱ्यावर आणि मानेला सनस्क्रीन लावा. जेणेकरून अतिनील किरणांपासून संरक्षण करता येईल.
पाणी पिणे तर महत्त्वाचे आहे, परंतु काही वेळा पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही त्वचेला हायड्रेशन मिळत नाही. त्यामुळे शरीराला तसेच त्वचेला हायड्रेशन देणे गरजेचे आहे. त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी फेस टोनर वापरा. दिवसातून किमान ५-६ वेळा चेहऱ्यावर टोनर स्प्रे करा. जेणेकरून त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडेपणा येत नाही.
त्वचेला योग्य पोषण आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोनदा घरगुती फेस पॅक चेहऱ्यावर लावा. मग तो दही आणि ओट्सचा फेस पॅक असो किंवा एलोवेरा जेलमध्ये हळद आणि लिंबू मिक्स करून बनवलेला फेस पॅक असो. तुमच्या त्वचेच्या समस्येनुसार जसे मुरुमांचे डाग, एक्ने आणि पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही कोणताही फेस पॅक लावू शकता. त्यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळते आणि त्वचेवर चमक येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
