मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Curly Hair: कंगना रणौतसारखे कुरळे केस हवे? हेअर केअरमध्ये करु नका या चुका

Curly Hair: कंगना रणौतसारखे कुरळे केस हवे? हेअर केअरमध्ये करु नका या चुका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 23, 2023 12:02 PM IST

Kangana Ranaut Birthday: कंगना रणौत तिच्या कुरळ्या केसांसाठी ओळखली जाते. तुम्हाला तिच्यासारखे सुंदर कर्ली केस हवे हवे असतील तर रोजच्या रूटीनमध्ये अशा चुका करू नका.

कंगना रणौतसारखे कुरळे केस मिळवण्यासाठी टिप्स
कंगना रणौतसारखे कुरळे केस मिळवण्यासाठी टिप्स (HT)

Curly Hair Care Tips: कंगना रणौतला तिच्या कुरळ्या केसांचा अभिमान आहे आणि ती नेहमी स्टाईने फ्लाँट करते. पण अनेक मुली त्यांच्या ड्राय, फ्रिजी आणि निस्तेज दिसणाऱ्या कुरळे केसांमुळे त्रासलेल्या असतात. अनेकदा त्यांचे कर्लही व्यवस्थित दिसत नाहीत. याचे कारण कुरळ्या केसांची तीच नियमित काळजी आहे, ज्यामुळे केस कोरडे आणि फ्रिजी दिसू लागतात. जर तुम्हाला कुरळे केस सुंदर दिसायचे असतील तर एक खास रूटीन पाळा आणि केस धुण्यापासून प्रोडक्ट लावताना अशा चुका करू नका.

केस टॉवेलने पुसू नका

कुरळे केस धुतल्यानंतर कधीही फ्लफी टॉवेलने पुसू नयेत. असे केल्याने कर्ल खराब होतात आणि केसांमध्ये कोरडेपणा येतो. टॉवेलऐवजी मऊ फॅब्रिकच्या टी-शर्टने आपले केस वाळवा. असे केल्याने कुरळ्या केसांचे नैसर्गिक तेल टिकून राहते.

कंडिशनर लावण्याची चूक करू नका

शॅम्पूनंतर कंडिशनर लावणे आवश्यक आहे. पण केस कुरळे असतील तर साधे कंडिशनर लावल्याने केसांना मुलायमपणा येत नाही. कुरळ्या केसांमध्ये नेहमी लीव्ह इन कंडिशनर वापरावे. जेणेकरून केसांमध्ये ओलावा टिकून राहून केस चमकदार दिसतात.

विंचरणे आवश्यक

दिवसातून एकदा किंवा दोनदा नव्हे तर कमीत कमी ६-७ वेळा केसांना ब्रश करणे आवश्यक आहे. जेणेकरून केस एकमेकांत अडकून वाईट दिसू नयेत. विंचरल्याने केसांचा नैसर्गिक पोत कायम राहतो आणि कर्ल अधिक चांगले दिसतात. ज्यामुळे तुमचे केस मॅनेजेबल राहतात आणि परफेक्ट कुरळे दिसतात.

हेअर ट्रिमिंग आवश्यक

जरी तुम्हाला कुरळे केस लांब करायचे असतील, तर केसांना तळापासून थोडेसे ट्रिम करा. ट्रिम केल्याने डॅमेज आणि स्प्लिट एंड्स सहज काढले जातात आणि केसांची वाढ होते. तसेच केस कोरडे दिसत नाहीत.

कॉटन पिलो कव्हर वापरू नका

जर तुमचे केस कुरळे असतील तर उशीसाठी कॉटन पिलो कव्हर कधीही वापरू नका. कॉटन पिलो कव्हर्स केसांचे नैसर्गिक तेल आणि आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे सिल्की पिलो कव्हर वापरा. जेणेकरून केसांचे नुकसान, कोरडेपणा आणि फ्रिजी होण्यापासून संरक्षण करता येईल.

मसाज आणि हेअर मास्क आवश्यक

कुरळ्या केसांना रोज तेलाने मसाज आणि आठवड्यातून किमान दोनदा हेअर मास्क लावणे आवश्यक आहे. जेणेकरून केस निरोगी आणि चमकदार राहतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel