Tips to Get Fuller Soft Lips Naturally: मुलींना मऊ आणि प्ल्म्पी ओठांचे वेड असते. सोशल मीडिया स्टार्सपासून ते बॉलीवूड आणि हॉलिवूडपर्यंतचे फुलर लिप्स पाहून अनेक मुली असे ओठ मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया देखील करत आहेत. जर तुम्हालाही असेच ओठ मिळवायचे असतील परंतु जर तुम्हाला सर्जरी करायची नसेल तर तुम्ही या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकता. यांच्या मदतीनेओठ मऊ तसेच भरलेले दिसतील.
जर तुम्हाला तुमचे ओठ मऊ आणि प्ल्म्पी दिसायचे असतील तर एक चमचा साखरेत खोबरेल तेल मिक्स करा. आता ते चांगले मिसळा आणि ओठांवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे ओठांवरची मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ मऊ होतील. शुगर स्क्रबच्या मदतीने तुम्हाला फुलर लुक देखील मिळेल. ही पद्धत केवळ काही काळ कार्य करते. स्क्रब केल्यावर लगेचच गुळगुळीत ओठ दिसतात.
आजकाल बाजारात अनेक लिप किट उपलब्ध आहेत,जे तुमच्या ओठांना काही काळ लिफ्ट देते आणि त्यांना फुलर लिप्स बनवते.
फुलर आणि मुलायम ओठ येण्यासाठी लिप बाममध्ये दालचिनीचे तेल मिक्स करा आणि ते ओठांवर लावा. हे लावल्याने तुमचे ओठ लगेच मऊ आणि प्ल्म्पी होतात.
ओठ मऊ आणि प्ल्म्पी होण्यासाठी त्यांना चांगले मॉइश्चरायझ करणे महत्वाचे आहे. ओठांना ऑलिव्ह ऑइल लावा आणि दररोज ओठांना नीट मसाज करा. याने तुमचे ओठ काही दिवसात एकदम मऊ दिसू लागतील.
यासोबतच जर तुम्हाला तुमचे ओठ कोरडे आणि निर्जीव दिसू नये असे वाटत असेल तर यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यासोबत इतर आरोग्यदायी द्रवपदार्थही प्या. जेणेकरून ओठ नैसर्गिकरित्या मऊ राहतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)