पाऊस पडायला लागला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मग ते किचनमधील समान असो वा सजावटीच्या वस्तू. पावसामुळे हवेतील ओलावा वाढतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. अशात घरातील लाकूड देखील फुगते. दरवाजे फुगतात, नीट बंद होत नाहीत. किंवा बंद केल्यास उघडणे अवघड होऊन बसते, दरवाज्यातून आवाज येतो, जर तुमच्या घरातही अशा प्रकारची समस्या उद्भवत असेल तर काय उपाय करावे हे जाणून घेऊया...
आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे आणि खिडकीचे दरवाजे फुगतात आणि घट्ट होतात. हे दरवाजे तुम्ही हेअर ड्रायरने दुरुस्त करा. दरवाजे फुगले असतील किंवा बंद होत नसतील तर ते हेअर ड्रायर वापरुन दुरुस्त करता येतात. खरं तर ड्रायरच्या गरम हवेमुळे लाकडावर येणारा ओलावा निघून जातो आणि दरवाजे सहज बंद होऊ लागतात.
जर गेटच्या कुंड्या, दरवाजाच्या कुंड्या जॅम झाल्या असतील तर त्यामध्ये मोहरीचे तेल घाला किंवा मशीनचे ऑइल टाका. यामुळे सर्व समस्या दूर होतील आणि कुंड्या सुरळीत बंद होतील.
दरवाज्यातून आवाज येत असेल तर कुंड्यांमध्ये साधे तेल रात्री घालावे. असे केल्यावर दारातून येणारा आवाज बंद होईल आणि दरवाजे सहज उघडू लागतील.
दारावर ओलावा येऊ नये म्हणून मेण तात्पुरते देखील लावता येते. ओलाव्यापासून दरवाजांचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्राईमिंग नंतर त्यांना रंगविणे. तीन ते चार वर्षांत दरवाजांवर प्राईमर आणि पेंट लावल्यास ते दीर्घकाळ सुरक्षित राहतात. पावसातही फुगण्याचा प्रकार घडत नाही.
पावसात दरवाजे फुलले तर पाऊस सुरू होण्यापूर्वी त्यावर तेल, पॅराफिन मेणाचा थर लावावा. यामुळे दारात ओलावा जाण्यापासून रोखला जाईल.
वाचा: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव
पावसात दरवाजे स्वच्छ करण्यासाठी पाण्यात ओले कापड वापरण्याऐवजी तेलात बुडवलेल्या कापडाने स्वच्छ करावे. यामुळे ओलावाही वाचेल.
पावसाळ्यात घरातील लाकडी वस्तूंची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. जर काळजी नाही घेतली तर लाकडी वस्तू फुगतात, त्यांना बुरशी पकडते, दरवाजे असतील तर त्यांचा आवाज यायला सुरुवात होते. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
संबंधित बातम्या